आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमा कोरेगाव हिंसाचार: मिलिंद एकबोटेंना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा; 20 फेब्रुवारीपर्यंत जामीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. कोर्टाने 20 फेब्रुवारीपर्यंत एकबोटे यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मुंबई हायकोर्टाने एकबोटे यांना जामीन देण्यास नकार दिला होता. नंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

 

एकबोटे यांनी दिलेल्या चिथावणीनंतर कोरेगाव-भीमा येथे दंगल उसळली, असा त्यांच्यावर आरोप आहे. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (अ‍ॅट्रॉसिटी) त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून चिथावणी देणे, दगडफेकीस प्रवृत्त करणे, लोकांना चिथावणी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे अटक होण्याच्या भीतीने एकबोटे यांनी पुणे सेशन कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र एकबोटे यांच्यावर दाखल असलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असेही कोर्टाने नमूद केले होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... मिलिंद एकबोटेंसह शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा...

बातम्या आणखी आहेत...