आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Monsoon दक्षिण अंदमानात दाखल, लवकरच कोकणमार्गे संपूर्ण महाराष्ट्रात प्रवेश करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मेकुनू चक्रीवादळाचा अडथळा दूर झाल्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) प्रगतीस पोषक वातावरण तयार झाले असून मान्सून दक्षिण अंदमानात दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. येत्या 48 तासांत गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

दरम्यान, अरबी समुद्रात     निर्माण झालेल्या 'मेकुनू' चक्रीवादळाने मान्सूनच्या प्रगतीत अडथळा आणला होता. परिणामी दक्षिण अंदमान समुद्रातील आगमन लांबेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. परंतु, आता हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने दूर गेले असून मान्सून सक्रीय होण्याच्या दृष्टीने पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण अंदमानात मान्सून पोहोचला आहे.

 

येत्या दोन दिवसांत गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...