आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंनी स्वीकारली भाजपची ऑफर, राज्यसभेवर जाणार; खडसेंचा नकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- २०१९ नंतर दिल्लीत जाण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या नारायण राणे यांनी अखेर भाजपची राज्यसभेवर जाण्याची ऑफर स्वीकारली आहे. सोमवारी ते अर्ज भरणार असल्याची माहिती भाजप सूत्रांनी दिली. महाराष्ट्रातील ६ जागांसह १६ राज्यांत राज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्चला मतदान होणार आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप प्रदेश अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली तेव्हाच त्यांना राज्यसभेची ऑफर देण्यात आली होती. भाजपच्या कोट्यातील ३ पैकी एका जागेवर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर व दुसऱ्या जागेसाठी राणे यांचे नावे नक्की झाले आहे. 

 

खडसेंचा नकार 
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यसभेवर जाणार असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला अाहे. अापल्याला पक्षाकडून विचारणा झालेली नाही. अापण राज्यसभेसाठी इच्छुक नसल्याचे ते म्हणाले.

 

कधी मतदान?

- 23 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.

 

महाराष्ट्रातून हे खासदार होणार निवृत्त...

वंदना हेमंत चव्हाण  - राष्ट्रवादी

डी. पी. त्रिपाठी  - राष्ट्रवादी

रजनी पाटील  - काँग्रेस

अनिल देसाई  - शिवसेना

राजीव शुक्ला - काँग्रेस

अजयकुमार संचेती - भाजप

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... एकनाथ खडसेंना दिल्लीत पाठवण्याच्या हालचाली

बातम्या आणखी आहेत...