आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिषेक बच्चनचे Twitter Account हॅक, पाकिस्तान समर्थक समूहाने लावला तुर्कीचा झेंडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. तुर्कीतील पाकिस्तानी समर्थक समूहाने अभिषेकच्या अकाउंटवर तुर्कीचा झेंडा लावला आहे. तसेच इंग्रजीत अनेक ट्वीटही केल्या आहेत.

 

तुर्कीतील पाकिस्तानी समर्थक साइबर आर्मी 'अयिल्दिज टीम' ने अभिषेकच्या ट्‍वीटर हँडलचे नाव बदलून JuniorBachchan चे JuniorBachchana असेही केले आहे. अकाऊंट हॅक झाल्यानंतर अभिषेक बच्चनच्या कव्हर फोटोच्या ठिकाणी एका मिसाइलची इमेज दिसत आहे. त्यावर सांकेतिक भाषेत 'अयिल्दिज टीम' असे लिहिले आहे.

 

ट्विटरच्या सूत्रांनी सांगितले की, आमची टीम भारतीय यूजर्सची अडचण दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे.  दरम्यान, एक दिवसाआधी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाले होते. अनुपम खेर यांच्यासह पदुत्चेरीचे राज्यपाल किरण बेदी, भाजप महासचिव राम माधव, राज्यसभा सदस्य स्वप्न दासगुप्ता यांचे टि्वटर अकाऊंट या समूहाने हॅक केले होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...