आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Palghar Bypoll: प्रचारासाठी स्मृती इराणी मैदानात, डहाणूमध्ये आज करणार रोड शो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीमुळे भाजप आणि शिवसेनेतील राजकारण ढवळून निघाले आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी आता शेवटचे दोन दिवस उरले असताना  भाजपने आता केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांना प्रचाराच्या मैदानात उतरवले आहे. स्मृती इराणी आज (शुक्रवार) दुपारी डहाणू भागात रोड शो करतील.

 

चौरंगी लढत...

काँग्रेसमधून भाजपमध्ये राजेंद्र गावित,         शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव अशी चौरंगी लढत होणार आहे. 

 

दरम्यान, भाजपने उत्तर भारतीय मते आपल्याकडे खेचण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अभिनेता आणि खासदार मनोज तिवारी यांच्यासह अनेक उत्तर भारतीय नेत्यांना पालघरच्या मैदानात उतरवले आहे.

 

उद्धव ठाकरेंचा प्रचाराचा धडाका...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पालघर पोटनिवडणुकीत प्रचाराचा धडाका लावला आहे. उद्धव ठाकरे यांची आज पालघरमध्ये दुसरी जाहीर सभा आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची वसईत प्रचारसभा घेतली. तसेच उद्धव ठाकरे यांनी पालघर मतदारसंघाचा ग्रामीण भाग पिंजून काढला आहे.

बातम्या आणखी आहेत...