आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Palghar bypoll: उद्धव ठाकरे-योगी आदित्यनाथ आज आमने-सामने; मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पालघर येथील लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास चिंतामण वाणगा यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (बुधवार) वसई येथे संध्याकाळी 6 वाजता सभा घेत आहेत, तर भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विरार येथे सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा आहे. काँग्रेसचे उमेदवार दामू शिंगडा यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची जाहीर सभा विरार येथे होणार आहे.

 

मुख्यमंत्री व्यापारी, उद्योजकांशी साधणार संवाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (ता.23) दुपारी पालघरमध्ये व्यापारी, उद्योजक यांच्याशी सवांद साधणार आहेत. दरम्यान, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत प्रचार शिगेला पोहचला आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीने प्रचारात जोर लावला आहे. 

 

मुख्यमंत्री यांच्या विरोधात तक्रार 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने  पालघर जिल्हाधिकार्‍यांना भेटून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली.

 

पुढील स्लाइड्‍सव ‍क्लिक करून पाहा संबं‍धित फोटो...     

बातम्या आणखी आहेत...