आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंचा किसान लाँग मार्चला पाठिंबा; मनसे ठाण्यात करणार जंगी स्वागत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नाशिकहून निघालेला डाव्यांचा नेतृत्त्वातील किसान सभेचा लाँग मार्चला शिवसेना पाठोपाठ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेही पाठिंबा दर्शवला आहे. खुद्द राज ठाकरे यांनी किसान सभेचे सचिव अजित नवले यांना फोन करुन, पाठिंबा दर्शवल्याचे सांगितले आहे. ठाण्यात आणि मुंबईत किसान लाँग मार्चाचे मनसेकडून जंगी स्वागत करणार आहे. मार्चमध्ये मनसैनिकही सहभागी होतील, अशी माहिती अजित नवले यांनी दिली आहे.

 

दरम्यान, कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात सवलती अशा मागण्यांसाठी नाशकातून निघालेला किसान लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला आहे. वाशिंद जवळील पडघा येथे हा मोर्चा दाखल झाला असून येत्या 12 मार्चला मार्च विधिमंडळावर धडक देणार आहे.

 

शिवसेनेचा पाठिंबा
ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनीही अजित नवलेंची भेट घेऊन त्यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आपल्याला पाठिंबा जाहीर केला आहे, तसा निरोप घेऊन मी आल्याचे शिंदे नवलेंनी सांगितले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... किसान सभेचा लाँग मार्चच्या मागण्या..

बातम्या आणखी आहेत...