आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगगुरु रामदेव बाबांचे हार्टअटॅकने निधन, जाणून घ्या या व्हायरल वृत्तामागील सत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- योगगुरु रामदेव बाबांचे हार्ट अटॅकने निधन झाल्याच्या सोशल मीडियावरील व्हायरल वृत्ताने काही दिवसांपूर्वी अनेकांना धक्का दिला होता. रामदेव बाबा बॅंकेच्या रांगेत उभे होते. अचानक त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. इतकेच नाही तर, रामदेव बाबांचे दोन फोटो झपाट्याने व्हायरल झाले होते. अखेर रामदेव बाबांनी खुद्द सोशल मीडियावर ते जिवंत असल्याचा खुलासा केला होता.

 

रामदेव बाबा म्हणाले की, माझ्या निधनाचे वृत्त सपशेल खोटे आहे. मला काहीही झालेले नाही. तसेच भविष्यातही मला कोणताच आजार होणार नाही. योगसाधनेच्या मदतीने मला आनंदी दीर्घायुष्य लाभले आहे.

 

हे दाखवण्यात आले फोटोमध्ये...
- रामदेव बाबांचे दोन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. एका फोटोत रामदेवांना एका अॅम्बुलन्समधून घेऊन जाताना दिसत आहे.
- दुसर्‍या फोटोत रामदेव बाबा एका स्ट्रेचरवर झोपले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येत आहे.

 

रामदेव बाबांचे कोणत्याच बॅंकेत अकाऊंट नाही...
- एका न्यूज चॅनलशी संवाद साधला असता मिळालेली माहिती अशी की, रामदेव बाबांचे कोणत्याच बँकेत अकाऊंट नाही.
- रामदेव बाबांना पैशाची काहीच कमी नाही. त्यामुळे ते बँकेच्या रांगेत उभे राहाण्याचे काहीच कारण नाही.

 

रामदेव बाबांनी वाचवले अनेकांचे प्राण...
- योगगुरु रामदेव बाबांनी सांगितले की, निधनाचे वृत्त खोटे आहे. ते आतापर्यंत कधीच बेशुद्ध पडले नाही.
- हार्ट अटॅक आलेल्या अनेकांचे प्राण आपण वाचवले असल्याचा दावा रामदेव बाबांनी केला आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सोशल मीडियावर व्हायरल झालेले रामदेव बाबांचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...