आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्या. लोया मृत्यू प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सोहराबुद्दीन खटल्यातील न्यायाधीश लोया यांच्या मृत्यू प्रकरणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यात उडी घेतली आहे. न्या. लोया प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करून कर नाही त्याला डर कशाला असा प्रश्न करत भाजपवर निशाणा साधला आहे. न्या. लोया मृत्यू प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करू नये, न्याय व्यवस्थेला त्यांचे काम करू द्यावे तसेच चार न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे समर्थन करत न्यायदेवता बहिरी आणि मुकी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. 


शनिवारी शिवसेना भवन येथे बोलताना ठाकरे म्हणाले,  न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, रंजन गोगोई, जे चेलमेश्वर आणि लोकूर यांनी घेतलेली पत्रकार परिषद ही लोकशाहीत दुर्दैवी घटना आहे. या चारही न्यायमूर्तींच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते पण त्यांनी हे पाऊल का उचलले याचा विचार करणे गरजेचे आहे.  सरकारने न्यायाधीशांच्या प्रकरणात हस्तक्षेप करू नये, न्यायदेवतेला त्यांचे काम करू द्यावे. लोकशाहीचा स्तंभ स्वतंत्रपणे उभा राहिला पाहिजे, जर याचा पाया कमजोर झाला तर लोकशाही ढासळेल, असेही ठाकरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...