आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना नेत्यावर हल्ल्याची ही पहिलीच वेळ नाही, पाहा आतापर्यंत झालेल्या हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची काल (रविवार) रात्री धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ते कांदिवली भागातून दोन वेळा शिवसेनेच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

 

बाईकवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. नंतर त्यांना हॉस्पिटलमध्येही हलवण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, अशोक सावंत यांनी दोनदा नगरसेवकपद भूषवले होते. त्यांची कन्याही एक वेळा नगरसेवक होती.

 

पूर्ववैमनास्यातून हत्या?
पूर्ववैमनास्यातून झालेल्या हत्येप्रकरणी जग्गा नामक आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. इतर चार हल्लेखोरांचा पोलिस कसून शोध घेत आहेत. विशेष म्हणजे हल्लेखोर सावंत यांच्याकडे कामाला होते. काही दिवसांपूर्वी खुद्द सावंत यांनीच त्यांना कामावरून काढून टाकले होते. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.

 

खंडणीच्या धमक्याही...
- अशोक सावंत यांना गेल्या काही दिवसापासून खंडणीसाठी धमक्या येत होत्या.
- या खंडणी प्रकरणातूनच त्यांची हत्या झाल्याचे सांगितले जात आहे.
- दहशतवाद विरोधी पथकातील एसीपी सुभाष सावंत हे त्यांचे भाऊ आहे.

 

मुंबईत शिवसेना नेत्यांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेक वेळा शिवसेनेच्या नेत्यांवर हल्ला झाला आहे. 1990 च्या दशकापासून आजपर्यंतचा हल्ल्यांचा इतिहास पाहाण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...