आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन तेंडुलकरच्या कन्येचे फेक ट्‍विटर अकाउंट बनवणार्‍या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिच्या नावाने फेक ट्‍विटर अकाउंट बनवणार्‍या सॉफ्टवेअर इंजिनिअरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नितिन शिसोदे (वय-39) असे आरोपीचे नाव असून हे प्रकरण 2017 मधील असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने साराच्या नावाने फेक ट्‍विटर अकाउंट बनवून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल आक्षेपार्ह ट्‍वीट केले होते. या प्रकरणी सचिन तेंडुलकरने नाराजी व्यक्त करत सायबर सेलकडे तक्रार नोंदवली होती.

 

कोण आहे आरोपी?
- न्यूज एजन्सीनुसार, नितिन शिसोदे हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तो अंधेरीतील लोकसरिता अपार्टमेंटमध्ये राहातो.

 

काय आहे हे प्रकरण?
- सायबर पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण 9 अॉक्टोबर 2017 चे आहे. नितिनने ट्‍विटरवर साराच्या नावाने फेक अकाउंट बनवले होते. गूगलवरून साराचा फोटो डाउनलोड करून त्याचा वापरही केला होता. या फेक अकाउंटवरून नितिनने शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह ट्‍व‍ीट केले होते.

- आरोपीने ट्‍वीट केले तेव्हा सारा लंडनमध्ये होती. त्यामुळे सचिनच्या स्वीय सचिवाने सायबर पोलिस स्टेशनला याप्रकरणी तक्रार नोंदवली होती.

 

असे जाळ्यात अडकला आरोपी

- सायबर पोलिसांनी सांगितले की, साराच्या नावाने फेक अकाउंट ट्विटर अकाउंट मोबाइल नंबरने बनवले होते. मोबाइल नंबर मिळाल्याने त्याचा आयएमयआय नंबरचा पोलिसांनी शोध घेतला.

 - पोलिसांनी इंटरनेट प्रोटोकॉल अर्थात आयपी अॅड्रेस लोकेट करून पोलिस आरोपीच्या घरी पोहोचले.

बातम्या आणखी आहेत...