आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रिया सुळेंचा ब्लॉग : तुमचं माझं नातं काय? जय शिवराय.. जय भीमराय !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सक्रांतींच्या मुहूर्तावर सुप्रिया सुळेंनी केंद्र आणि राज्यातील सरकारच्या विरोधात एका नव्या माध्यमातून रणशिंग फुंकले आहे.  हे नवे माध्यम म्हणजे ब्लॉग. ब्लॉगच्या माध्यमातून सरकारविरोधातील लढाईला निर्धारपूर्वक सुरुवात करत असल्याचे सांगत संक्रांतीच्या महूर्तावर सुप्रिया सुळेंनी रविवारी पहिला ब्लॉग प्रसिद्ध केला. 'स्थित्यंतराच्या दिशेने' अशा नावाने लिहिलेल्या या पहिल्याच ब्लॉगमध्ये सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. सरकारची चुकीची धोरणे आणि जातीवाद भडकवण्याचा प्रयत्न यावर त्यांनी ब्लॉगमधून खरमरीत टीका केली आहे. 


असा आहे ब्लॉग...
नमस्कार, तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ! संक्रांत म्हणजे स्थित्यंतर ! सूर्याचे उत्तरायण आजपासून सुरू होते ! आपल्या आकाशगंगेच्या महत्त्वाच्या बदलातील एक क्षण म्हणजे ही संक्रांत !!

आज देशातही असंच स्थित्यंतर सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी अभूतपूर्व अशी पत्रकार परिषद घेऊन या देशातली लोकशाही वाचवायची साद लोकांना घातलीय. ज्यांच्याकडे न्यायाची अपेक्षा घेऊन सामान्य माणूस जातो त्यांनीच न्याय मिळावा म्हणून लोकशाहितल्या सर्वशक्तिमान न्यायालयाला, म्हणजे जनतेला आवाहन केलेय. जगभरात या घटनेला भारतीय लोकशाहीचा आक्रोश म्हणून पाहिलं जातंय. अश्या काळात, इथल्या मनूवादी हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात निर्णायक लढाई लढण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर येऊन पडते. आजपासून सुरू होणारा हा माझा ब्लॉग त्याच लढाईचा माझ्यापरीने छोटासा पण निर्धारपूर्वक सुरू झालेला भाग आहे.


पुढील स्लाइड्सवर वाचा, सुप्रिया सुळेंनी लिहिलेला ब्लॉग त्यांच्याच शब्दांत..

बातम्या आणखी आहेत...