आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत अनैसर्गिक कृत्य..नराधमांनी पेट्रोल टाकून जाळला अल्पवयीन मुलाचा प्रायव्हेट पार्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने नराधमांनी अल्पवयीन मुलाचा प्रायव्हेट पार्ट जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिंडोसी भागात 28 डिसेंबरला ही घटना घडली. 13 वर्षीय मुलावर 4 तरुणांनी अनैसर्गिक दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, नराधमांना त्यात यश आले नाही. त्यावर संतापलेल्या नराधमांनी मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आलाआहे.

 

काय आहे हे प्रकरण?

- पीडित मुलगा रमजान (बदललेले नाव) 28 डिसेंबरला रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास मित्र कलीम (बदललेले नाव) याच्यासोबत फिल्मसिटीतील शूटिंग पाहून घराकडे येत होता.
- संतोष नगर बस स्टॉपजवळील वेलकम कॉलनीसमोर रस्त्याच्या बाजूला 4 जण शेकोटोच्या शेजारी बसून नशा करत होते.
- एकाने रमजानला पकडले आणि रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या काळ्या रंगाची जीपमागे घेऊन गेला. भामट्याने रमजानला जबरदस्तीने थिनर सुंगवले.
- दुसर्‍या एकाने रमजानवर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. परंतु रमजानने कशीबशी भामट्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेतली. रमजान पळत असताना एकाने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर पेट्रोल टाकून पेटवून दिले.
- आगीत रमजान गंभीररित्या भाजला गेला आहे. कलीम याने आग विझवण्याचा प्रयत्न केला.

 

योगीराज ठरला देवदूत..
रमजानच्या आईने सांगितले की, योगीराज शेट्टी हे रमजानसाठी देवदूत ठरले. योगीराज शेट्‍टी यांनी रमजानला पाहिले. त्याला चादर गुंडाळून दिंडोसी येथील राधा-कृष्ण हॉस्पिटलमध्ये दाखल केले. योगीराज शेट्टी हे फिल्म व्हिडिओ एडिटर आहे.

शेट्टी यांनी सांगितले की, रमजान रस्त्याच्या कडेला जळत होता. आणि लोक केवळ पाहात होते. कार थांबवून त्याला चादर गुंडाळली आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

 

रमजानची प्रकृती चिंताचनक..
राधा-कृष्ण हॉस्पिटलनुसार, रमजानची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला पुढील उपचारासाठी जोगेश्वरी ट्रॉमा सेंटर येथे हलवण्यात आले आहे. ट्रॉमा सेंटरच्या सूत्रांनी सांगितले की, 4 दिवसांच्या उपचारानंतरही रमजानच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसत नाही. नंतर रमजान याला कस्तूरबा बर्न हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. रमजानच्या आईने सांगितले की, काल (गुरुवार) सायंकाळी त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्‍यात आली.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...