आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून विश्वास नांगरे पाटील यांचे नाव घेतले जाते. महाराष्ट्रातील तरुणाईपुढेही ते आदर्श आहेत. युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या 'मन मे है विश्वास' या पुस्तकाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विश्वास यांच्या आयुष्यात पत्नी रुपाली यांचे पाठबळ मोठे आहे. नवऱ्याची मैत्रीण, सहकारी म्हणून सक्षमपणे त्या आपली भूमिका पार पाडतात. 'व्हॅलेंटाईन विक'मध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय विश्वास नांगरे पाटील व रुपाली यांच्या लग्नाची गोष्ट..
विश्वास यांच्या करिअरला औरंगाबादने दिले वेगळे वळण..
विश्वास नांगरे पाटील यांचे करिअर व वैवाहिक जीवनाची सुरूवातच औरंगाबादेतून झाली. आयपीएस झाल्यावर 1999 मध्ये त्यांची प्रोबेशनवर पहिली बदली औरंगाबाद जिल्ह्यात झाली. फुलंब्री, कन्नड आणि सिल्लोड या विभागात त्यांनी काम केले. कन्नडचे कल्याण औताडे यांच्याशी विश्वास यांची मैत्री झाली. त्यांनीच पद्माकर मुळे यांची मुलगी रूपालीताई हिच्या लग्नाचा प्रस्ताव आणला होता. कल्याण औताडे यांनी मुळे कुटुंबीयांशी बोलणी करून मुलगी पाहण्याचा कार्यक्रम निश्चित केला. विश्वास, मित्रासोबत मुलगी बघायला गेले.
दोनदा झाला मुलगी बघण्याचा कार्यक्रम..
मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात रुपाली यांना काही वेळच विश्वास यांच्या समोर येता आले. त्यामुळे पहिल्या भेटीत या दोघांमध्ये फार बोलणे झाले नाही. पाहण्यासाठी चौघे आलेले असल्यामुळे नेमका मुलगा कोणता, असा प्रश्न रूपालीताई यांना पडला होता. यामुळे पुन्हा दुसर्या दिवशी भेटण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार रूपालीताई एका नातेवाइकासोबत कॅफे हाऊसमध्ये भेटण्यासाठी आल्या. या वेळी दोघांनी तब्बल तासभर चर्चा केली.
नांगरे पाटील यांच्या वडिलांना मराठवाड्यातील मुलगी मान्य नव्हती. कोल्हापूर, सांगली किंवा सातार्याची मुलगी सून म्हणून आण, असा खाक्याच त्यांनी दिला होता, पण अखेर विश्वास यांच्या पसंतीला मान देत वडिलांनी लग्नाला होकार दिला.
पुढील स्लाइड्सवर वाचा, रुपाली आहेत बेस्ट होममेकर...विश्वास यांना खाकी वर्दीत पाहून रुपाली झाल्या होत्या 'इम्प्रेस'..अशा जुळली रेशीमगाठ !
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.