आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Valentine Special:रामदेव बाबांच्या आशीर्वादाने आमदाराने थाटला दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत संसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील बडनेरा विधानसभा मतदार संघातील अपक्ष आमदार रवी राणा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री नवनीत कौर हे प्रेमीयुगुल सामुहिक विवाह सोहळ्यात लग्नाच्या बेडीत अडकले.  2 फेब्रुवारी 2011 रोजी झालेल्या या सामुहिक विवाह सोहळ्यात तब्बल 3162 जोडपे विवाहाच्या बंधनात अडकले होते. त्यात 2443 हिंदु, 739 बौद्ध, 150 मुस्लिम, 15 ख्रिश्चन आणि 13 अंध जोडप्यांचाही समावेश होता. व्हॅलेंटाईन विकमध्ये आम्ही आपल्यासाठी योगगुरु रामदेव बाबा यांच्या आशीर्वादाने संसार थाटलेले आमदार रवी राणा आणि अभिनेत्री नवनीत कौर यांची लग्नाची गोष्ट घेऊन आलो आहे.

 

रामदेव आश्रमात जुळल्या रेशीमगाठी...

नवनीत कौर यांना योगासणांची आवड आहे. त्या योगगुरु रामदेव बाबा यांच्या शिष्य आहेत. त्याचे पती रवी राणा हे देखील रामदेव बाबांना मानतात. रामदेव बाबा यांच्या एका शिबीरातच रवी राणा आणि नवनीत यांची भेट झाली होती. त्यानंतर दोघांनी रामदेव बाबांच्या आर्शीवादाने संसार थाटला. 2011 मध्ये लग्न झाल्यानंतर नवनीत यांनी चित्रपटांना रामराम केला आणि पतीसोबत राजकीय मार्ग निवडला.

 

तत्‍कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरू रामदेव बाबा, सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांच्यासह बॉलिवूडमधील विवेक ओबेरॉय यानेही रवी राणा आणि नवनीत यांच्या विवाह समारंभात उपस्थित होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... नवनीत कौर आणि वाद...एक पक्के समीकरण

 

बातम्या आणखी आहेत...