आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे व्हीलचेअर स्टार; FB वर सर्वाधिक चाहते, रिअॅलिटी शोनंतर \'बॉलीवूड\' लक्ष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ही आहे देशातील पहिली व्हीलचेअर स्टार. तिचे नाव आहे गीत. तिला सुपरस्टार व्हायचे आहे. तिचे जीवनच खरे तर एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखे आहे. शारीरिकदृष्ट्या अपंगत्वामुळे नैराश्य आलेल्या लोकांसाठी गीत एक प्रेरणाच आहे.

 

तेव्हा गीत केवळ 10 वर्षांची होती. कारच्या मागच्या सीटवर ती बिनधास्त झोपलेली होती. अचानक मोठा अपघात झाला आणि तिचा जीवनातील संघर्ष सुरू झाला. तिला शुद्ध आली तेव्हा ती रुग्णालयात होती. प्रचंड वेदना होत होत्या. तिला या अपघातात दोन्ही पाय गमवावे लागले होते. ती जीवनभर स्वत:च्या पायावर उभी राहू शकणार नव्हती. गीत सांगते, तेव्हा मला प्रचंड नैराश्य आले होते. पायच नसतील, तर हे आयुष्य पुढे जाणार कसे, हा प्रश्न होता.

 

गीत सांगते, मला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड होती, परंतु हा अपघात झाला आणि सारे काही संपले. आता हा छंद म्हणजे केवळ स्वप्नच ठरणार होते.

शालेय जीवनातील आठवणी सांगताना गीत म्हणते, एकदा एका नाटकात मला काम करायचे होते. मात्र, शिक्षकांनी मला नाकारले. कारण तसेच होते. पाय नसलेले पात्र या नाटकात कोणत्याही संदर्भाने टाकता येणार नव्हते. व्हीलचेअरवर बसून अभिनय करणारे पात्र कथानकात आणायचे कुठून, असा प्रश्न होता. या नैराश्यात कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींनी मात्र मला कायम प्रेरणा, प्रोत्साहन दिले. प्रारंभी काही अडचणी आल्या. मात्र, एखादा अपघात माणसाचे स्वप्न हिरावून घेऊ शकत नाही, याची खात्री तेव्हा मला पटली.

 

बॉलवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकी हिच्या पेजला 12 लाख 2 हजार लोकांनी, मनोज वाजपेयीच्या पेजला 3 लाख 55 हजार लोकांनी लाइक्स दिले आहेत. या तुलनेत गीतच्या पेजला मात्र केवळ साडेतीन महिन्यांत 13 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, 13 लाखांहून जास्त फेसबुक चाहते असणार्‍या या व्हीलचेअर स्टारचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...