आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेनच्या दरवाज्यात उभे राहून मोबाइलवर बोलण्याआधी ही बातमी नक्की वाचा, तरुणीसोबत घडले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- तुम्ही लोकल ट्रेनच्या दरवाज्यात उभे राहून मोबाइलवर बोलत असाल तर सावधान! हे तुमच्या जीवावरही बेतू शकते. अशीच एक घटना सॅण्डहर्स्ट रोड आणि मस्जिद स्टेशनदरम्यान घडली आहे.

 

मोबाइल चोरीच्या प्रयत्नात एक 23 वर्षीय तरुणी धावत्या ट्रेनमधून खाली पडून गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. सॅण्डहर्स्ट रोड आणि मस्जिद स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. मोबाइल चोराने तरुणीच्या हातावर काठी मारल्याने तिचा तोल गेला आणि ती खाली पडली, अशी माहिती आरपीएफ अधिकार्‍याने दिली आहे. या घटनेची दखल घेऊन रेल्वे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अल्पवयीन मोबाइल चोराला ताब्यात घेतले आहे.

 

एक पाय आणि हाताची बोटे...
द्रविता सिंह असे या तरुणीचे नाव आहे. ती कल्याणची राहाणारी असून ती गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी निघाली होती. सीएसटीएमच्या दिशेने जाणारी लेडिज स्पेशल ट्रेनमध्ये ती बसली. प्रवासात तिच्या मोबाइलचा नेटवर्क गेल्यामुळे ती फोनवर बोलण्यासाठी ती दरवाज्याजवळ येऊन उभी राहिली. सॅण्डहर्स्ट रोड स्टेशन सोडल्यानंतर मस्जिद स्टेशनजवळ लोकलचा वेग कमी होताच प्लॅटफॉर्मवर उभ्या एका चोरट्याने तिच्या हातावर काठीने फटका मारला. ती धावत्या ट्रेनमधून खाली पडली आणि दुसर्‍या ट्रॅकवरून येणार्‍या ट्रेनने द्रविताला धडक दिली. या अपघातात द्रविताने आपला एक पाय आणि हाताची काही बोटे गमवावी लागली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...