आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- पंजाब नॅशनल बॅंकेची 177.17 कोटी डॉलर म्हणजेच 11, 356 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. बॅंकेने या प्रकरणात हिरे व्यापारी नीरव मोदीविरोधात सीबीआयकडे दोन तक्रारी दाखल केल्या आहेत. देशातील डायमंड किंग म्हणून ओळख असलेल्या नीरवची फोर्ब्सच्या श्रीमंत यादीत स्थान पटकावले होते. केट विन्सलेटपासून ते प्रियांका चोप्रापर्यंत हॉलिवूड, बॉलिवूड स्टार्सने त्याच्या हिरे घालून रेड कार्पेटवर आपले जलवे दाखवले आहेत. डायमंड बिजनेसमध्ये यायचे नव्हते नीरवला...
- 48 वर्षीय नीरव मोदी बेल्जियममधील शहर ऐंटवर्पमध्ये हि-याचा व्यापार करणा-या परिवारातून येतो.
- नीरवने वॉर्टनमधून फायनान्समधून एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला मात्र तेथे तो फेल झाला. त्यामुळे त्याला हि-यांच्या व्यापारात उतरावे लागले.
- त्याचे कुटुंबिय सुरूवातीपासूनच हिरे व्यवसायात होते. एका इंटरव्यूमध्ये नीरवने सांगितले होते की, तो कधीही हिरे व्यवसायात येऊ इच्छित नव्हता.
- वयाच्या 19 व्या वर्षी तो मुंबईत आपले मामा आणि गीतांजली जेम्सचे चेअरमन मेहुल चौकसी यांच्याकडे आला. त्यांच्याकडेच त्याने हिरे व्यापाराचा बिजनेस समजून घेतला.
- वर्ष 1999 मध्ये त्याने 'फायर स्टार डायमंड' नावाची कंपनी सुरू केली. तसेच नंतरच्या काळात त्याने काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे अधिग्रहण केले.
- यानंतर त्याने आपले नेटवर्क विदेशांत पसरविण्याचा निर्णय घेतला. तसेच कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चुरिंग फील्डमध्ये पाऊल ठेवले.
अनेक हॉलिवूड- बॉलिवूड सेलेब्रिटीज घालतात नीरवची ज्वेलरी-
- आंतरराष्ट्रीय ज्वेलरी मार्केटमध्ये नीरव मोदीचे मोठे नाव आहे. त्याची ज्वेलरी केट विन्सलेट, कार्ली क्लास यासारख्या आंतरराष्ट्रीय तर प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, सोनम कपूर आणि लिझा हेडन यासारख्या भारतीय अभिनेत्रींनी ऑस्करसारख्या समारंभात त्याची ज्वेलरी घातली आहे.
- यातील अनेक जणी नीरवच्या ब्रॅंड अॅम्बेसेडर सुद्धा राहिल्या आहेत. जगातील डायमंड कॅपिटल एंटवर्पमध्ये जन्मलेला नीरव ‘नीरव मोदी’ ब्रॅड नावाने आपले प्रॉडक्ट विकतो.
अनेक देशांत नीरवचा बिजनेस-
- भारताशिवाय नीरवचा रशिया, आर्मेनिया आणि दक्षिण अफ्रिकेत मॅन्युफॅक्चुरिंग यूनिट्स आहेत.
- 2014 मध्ये त्याने आपले पहिले मोठे डायमंड बुटीक दिल्लीतील डिफेन्स कॉलनीत तर पुढच्याच वर्षी मुंबईतील काळा घोडा भागात सुरू केले.
- नीरवचे एक शानदार स्टोअर न्यूयॉर्कमधील मेडिसन एवेन्यूमध्ये सुद्धा आहे. शिवाय त्याची स्टोअर लंडन, सिंगापूर, बीजिंग आणि मकाउमध्ये आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, नीरव मोदीचे काही निवडक फोटोज....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.