आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या ठिकाणी होते ब्रिटीश राज, त्यामुळे भारताला द्यावे लागत होते कोट्यवधी रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या मार्गावर धावणारी एकमेव शकुंतला एक्सप्रेस. - Divya Marathi
या मार्गावर धावणारी एकमेव शकुंतला एक्सप्रेस.

मुंबई- विदर्भात असा एक रेल्वे मार्ग होता ज्यासाठी भारत सरकार ब्रिटीशांना दरवर्षी 1 कोटी 20 लाख रुपये देत होते. या मार्गाचा मालकी हक्क भारतीय रेल्वेकडे नव्हता तर ब्रिटीशांकडे होता. त्यामुळे रॉयल्टी म्हणून ही रक्कम ब्रिटीश कंपनीला भारत सरकार रक्कम देत होते.

 

 

या मार्गावर केवळ एकच ट्रेन
- या रेल्वे मार्गावर केवळ शकुंतला एक्स्प्रेस नावाची एक पॅसेंजर धावते. अमरावती ते मुर्तजापूर या 189 किलोमीटरच्या अंतरासाठी ती 6 ते 7 तास घेते. 

- या मार्गावर शकुंतला एक्स्प्रेस अचलपूर, यवतमाळसह 17 छोट्या-मोठ्या स्थानकांवर थांबते. 

- 100 वर्ष जुन्या या रेल्वेला 70 वर्षाचे स्टीम इंजन ओढत होते. त्याला 1921 मध्ये मॅनचेस्टरमध्ये बनविण्यात आले होते. 

- 15 एप्रिल 1994 पासून शकुंतला एक्स्प्रेसला स्टीम इंजिनाऐवजी डिझेल इंजन जोडण्यात आले.
- या मार्गावर असणारे सिग्नलही ब्रिटीशकालीन आहेत. ते इंग्लंडमधील लिव्हरपूल येथे 1895 मध्ये बनविण्यात आलेले आहेत. 

- या मार्गावर रोज एक हजाराहून अधिक लोक प्रवास करतात. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...