आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPS शिवदीप लांडेंची धडक कारवाई, बारमधील अनोख्या गुहेत लपलेल्या 12 बारबालांना घेतले ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बिहारमध्ये आपल्या दबंग कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेणा-या IPS व मली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी रविवारी रात्री मुंबईतील एका बारवर धडक कारवाई केली. शिवदीप यांनी एका डान्सबारवर धाड टाकून 12 बारबालांना ताब्यात घेतले. या बारबाला बारमधील शौचालयाच्या गुहेत लपवल्या गेल्या होत्या. मात्र, शिवदीप यांना टीप मिळाल्याने त्यांनी धडक कारवाई करत बारमालकांची अनोखी शक्कल उघडी पाडली. 

 

रविवारी रात्री शिवदीप आपल्या सहका-यांसह गस्तीवर होते. त्यावेळी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डायमंड चित्रपटगृहाजवळील कल्पना डान्सबारमध्ये अनेक बारबाला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शिवदीप यांनी आपल्या सहका-यांसह तेथे धाड टाकली. यावेळी मात्र बारमध्ये 2 बारगर्ल, इतर 9 जण व 18 ग्राहक आढळून आले. 

 

नियमाप्रमाणे डान्सबारमध्ये 4 बारगर्ल ठेऊ शकतात. मात्र, ग्राहक व इतर लोकांची संख्या जास्त असल्याने काही तरी बनाव असल्याचे चाणाक्ष शिवदीप यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सहका-यांना डान्सबारची झाडाझडती घेण्यास सांगितले. स्वत:ही सहभागी झाले. यावेळी शौचालयातून एका गुहेत लपलेल्या 12 बारबालांना ताब्यात घेतले. ही गुहा कोणाच्याही लक्षात येणार नाही अशी त्याची व्यवस्था करण्यात आली होती. 

 

मात्र, खात्रीशीर टिप मिळाल्याने व ग्राहकांची संख्या जास्त असल्याने शिवदीप यांनी बारमालकांची अनोखी शक्कल उघडी पाडली व 12 बारबालांना ताब्यात घेऊन सुधारगृहात पाठविण्यात आले. या कारवाईत 12 बारबाला, बारमधील 9 जणांसह 18 ग्राहकांवर कारवाई करण्यात आली.

 

बातम्या आणखी आहेत...