आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी: काँग्रेस नेते व साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे यांचे निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी आमदार जयंत ससाणे - Divya Marathi
माजी आमदार जयंत ससाणे

शिर्डी- शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष, माजी आमदार जयंत मुरलीधर ससाणे (वय- 60) यांचे आज पहाटे श्रीरामपूर येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 4 वाजता श्रीरामपूर येथील अमर धाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

 
जयंत ससाणे हे श्रीरामपूरचे 10 वर्षे आमदार आणि 15 वर्षे नगराध्यक्ष होते. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक भक्ताभिमुख व लोकाभिमुख कामे केली होती. साई आश्रम भक्त निवास, प्रसादलाय, शहरातील रस्त्यांचे भूसंपादन, विमानतळ उभारणीला निधी ही कामे कायम लक्षात राहणारी आहेत.

 

श्रीरामपूर नगरपालिकेला त्यांनी जिल्ह्यात सर्व योजना राबवणारी व सक्षम नगरपालिका अशी ओळख मिळवून दिली होती. श्रीरामपूरची पाणी योजना, रस्ते, दुभाजकाचे सुशोभीकरण, झोपडपट्टी मुक्ती आदी कामाचे श्रेय ससाणे यांना जाते.

 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच ससाणे यांची श्रीरामपूर येथे त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. 

बातम्या आणखी आहेत...