आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेर्चा अादिवासींचा, त्यांच्यासाठी काहीही करण्यास तयार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नाशिकवरून सुरू झालेला शेतकऱ्यांचा मोर्चा म्हटला जात असला तरी हा मोर्चा शेतकऱ्यांचा नसून आदिवासी जनतेचा आहे. मोर्चातील ९० टक्क्यांकडे जमीनच नसल्याने ते शेतीही करू शकत नाहीत. आदिवासी असे आहेत, ज्यांच्यासाठी खूप काही करावेसे वाटते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर बोलताना दिली. तसेच कृषिमंत्री असूनही शरद पवार यांनी स्वामिनाथन आयोग लागू केला नाही. एमएसपी लागू केला नाही. आम्ही मात्र सत्तेवर आल्यावर लगेचच एमएसपी लागू केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, रविवारी जेव्हा मोर्चा सोमैया मैदानात आला तेव्हा आम्ही निरोप पाठवला की, दहावीची परीक्षा असल्याने मोर्चा सकाळी आला तर विद्यार्थ्यांना परीक्षेला जायला त्रास होईल. तुम्ही रात्रीच मुंबईला आलात तर बरे होईल. आमदार गावित यांनी आदिवासींना ही बाब सांगितल्यानंतर दिवसभर चालून दमलेले आदिवासी बांधव रात्री जेवले आणि लगेचच परत २५ किमी चालून मुंबईत पोहोचले. त्यांना सर्व्हिस रोडने येण्यास सांगितले होते. एकही आदिवासी सर्व्हिस रोडच्या बाहेर नव्हता. इतकी शिस्त अन्य कोणातही दिसत नाही.


आदिवासींना कुणीही जवळ केले नाही
आजपर्यंत कम्युनिस्ट पक्षांनी अनेक वेळा मोर्चे काढले. परंतु सरकारने त्यांच्याकडे कधीही लक्ष दिले नव्हते, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, नेत्यांनी मला सांगितले, आमचा पूर्वीचा अनुभव पोलिस अटक आणि हाणामारीचा होता. त्यामुळे आपल्यालाही अटक होईल, असे आम्ही रविवारी मोर्चेकऱ्यांना सांगितले होते. मात्र, आम्हाला एक वेगळाच अनुभव आला. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि अन्य सर्व पक्षांनी त्यांच्या मोर्चाला पाठिंबा दिला ते योग्यच झाले. कारण या आदिवासी जनतेला आजवर कोणी जवळ केलेच नव्हते, असेही ते म्हणाले. 

 

एमएसीपीचा निर्णय घेतला

स्वामिनाथन आयोग लागू करणार का असे विचारता मुख्यमंत्री म्हणाले, ‘अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात स्वामिनाथन समिती नेमण्यात आली. समितीने अहवाल दिला, परंतु आमचे सरकार गेले. मनमोहनसिंग पंतप्रधान होते. शरद पवार कृषिमंत्री होते तेव्हा त्यांनी स्वामिनाथन आयोग लागू केला नाही. एमएसपीचा निर्णय घेतला नाही. आम्ही मात्र सत्ता आल्याबरोबर एमएसपीचा निर्णय घेतला.’

बातम्या आणखी आहेत...