आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसे चालते RSS चे काम, वाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत 10 FACTS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एक सैनिक तयार करण्यासाठी लष्कराला 6 ते 7 महिने लागतात, संघ 3 दिवसात जवान तयार करु शकतो. ही आमची क्षमता आहे, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यवर विरोधी पक्षांनी टीकास्त्र सोडले आहे. भागवतांनी जवानांचा अपमान केला आहे, त्यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. यावर संघाने स्पष्टीकरण देऊन वेळ मारली आहे. पण आरएसएस ही संस्‍था नेमकी काय आहे, यासंघटनेचे काम कसे चालते याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत. भाजपची मातृसंस्था....

 

- डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी 27 सप्टेंबर 1925 रोजी दस-याच्‍या मुर्हतावर त्यांच्या 'शुक्रवारी' परिसरातील नागपूर येथील निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. आजही संघाचे मुख्‍यालय नागपूर येथेच आहे.
- राष्ट्रीय सेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्‍था आहे. एवढेच नाही तर भाजपचे अनेक मोठे नेते हे संघाचे स्‍वयंसेवक राहिलेले आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे. 
- संघाच्‍या पहिल्‍या शाखेत केवळ 5 व्‍यक्‍ती सहभागी होत्‍या. आज देशभरात 50 हजारांपेक्षा अधिक शाखा आहेत आणि त्‍यात 90 लाख स्वयंसेवक म्‍हणून काम करतात.
- आरएसएस सदस्याचे ना रजिस्ट्रेशन होते ना त्याबाबत काही आयडी कार्ड या बिजनेस कार्ड दिले जाते.
- देशातील कोणताही नागरिक यात येऊ शकतो व कधीही बाहेर जाऊ शकतो. मात्र, मुली, महिलांना प्रवेश दिला जात नाही.

 

आतापर्यंत चार वेळा संघावर बंदी-

 

- भारतामध्‍ये इंग्रजांच्या काळात संघावर पहिल्‍यांदा बंदी घातली गेली होती. 24 जानेवारी 1947 रोजी पंजाबमधील नेते मलिक खिजर हयात तिवाना आणि उतरा भद्र यांनी पुढाकारामुळे ब्रिटिश सरकारने संघाबरोबरच मुस्लिम नॅशनल गार्ड या संघटनेवर बंदी आणली होती. 28 जानेवारी 1947 रोजी बंदी उठवली गेली.

 

- राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचा सक्रिय कार्यकर्ता नथुराम गोडसे याने वर्ष 1948 मध्‍ये महात्‍मा गांधींची गोळ्या झाडून हत्‍या केली. त्‍यानंतर  संघाच्‍या शाखेत पेढेही वाटले गेले. त्‍यामुळे देशभर संघाविरुद्ध जनक्षोभ निर्माण झाला. संघाची विचारणी मानणा-यांवर हल्‍ले झालेत. त्‍यामुळे सरकारने संघावर बंदी आणली. तरुण स्वयंसेवकांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या नव्या विद्यार्थी संघटनेत काम करण्यास सुरुवात केली. 1949 मध्‍ये काही अटींवर ही बंदी उठली गेली.

 

- देशात वर्ष 1975 आणीबाणी जाहीर झाली आणि संघ व इतर अनेक संघटनांवर बंदी घालण्यात आली. ती 1977 पर्यंत होती. अनेक संघनेते तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आले, तर कित्येक अज्ञातवासात राहिले. मात्र, आणीबाणी रद्द होऊन जनता राजवट आल्यावर संघाच्या कार्याला जोराने गती मिळाली.

 

- 1992 मध्‍ये 1.5 लाख कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली. त्‍यामुळे देशभर हिंदू-मुस्‍लीम दंगली उसळल्‍या. या घटनेनंतर देशात राष्ट्रीय स्वयंसेवकवर बंदी आणली गेली होती.

 

कोण आहेत मोहन भागवत?

 

- व्‍यवसायाने पशू चिकित्सक असलेल्‍या मोहन भागवत यांची सरसंघचालक म्‍हणून 2009 मध्‍ये निवड झाली.

- 11 सप्‍टेंबर 1950 ला चंद्रपूर येथे त्‍यांचा जन्‍म झाला. त्‍यांचे वडील मधुकरराव भागवत हे चंद्रपूर शाखेचे प्रमुख होते. त्‍यांनी गुजरातचे प्रांत प्रमुख प्रचारक म्‍हणूनसुद्धा काम केलेले आहे.

- चार भाऊ-बहिणीत मोहन भागवत हे सर्वांत मोठे आहे. त्‍यांनी अकोला येथून पशू चिकित्साचे शिक्षण घेतले.

- 1975 पासून संघाचे पूर्ण वेळ स्‍वयंसेवक म्‍हणून त्‍यांनी कामाला सुरुवात केली. पुढे नागपूर आणि विदर्भाचे प्रचारकसुद्धा राहिले.

- 1991 मध्‍ये आरएसएसच्‍या शारीरिक प्रशिक्षण कार्यक्रमात ते अखिल भारतीय प्रमुख झाले. 21 मार्च 2009 ला त्‍यांना के. एस. सुदर्शन यांच्‍या जाग्‍यावर सरसंघचालक करण्‍यात आले.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, संघाबाबत दहा महत्‍त्‍वपूर्ण गोष्‍टी...

बातम्या आणखी आहेत...