आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी टाईमपाससाठी केले हे काम, एका आयडियाने बनवले करोडपती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीना लेखी या बँग ब्रॅन्ड बैगिटच्या संस्थापक आहेत. - Divya Marathi
नीना लेखी या बँग ब्रॅन्ड बैगिटच्या संस्थापक आहेत.

मुंबई- महिला उद्यमी नीना लेखी द्वारा संचालित अॅक्ससरीज आणि बॅग ब्रॅन्ड बैगिटने आर्थिक वर्ष 2019 मध्ये वार्षिक 25 टक्के वाढीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. नीना लेखी या लहानपणापासूनच अभ्यासात अव्वल होत्या. आपल्या क्लासनंतर त्यांनी मिळणार्या वेळेत ‘श्याम आहूजा’ यांच्या डिझायनर शोरुममध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्यांना एक युक्ती सुचली. त्यांनी विचार केला की टी शर्टवर काही घोषणा लिहिलेल्या असतात, अशाच पध्दतीच्या घोषणा लिहिलेल्या बॅगा आपण तयार कराव्यात. बैगिट कंपनीची वार्षिक उलाढाल 160 कोटीपेक्षा जास्त आहे. 

 

 

लिफ्टमॅन आणि जीप नीट करणाऱ्याकडून घेतली मदत
- नीनाने कमर्शियल आर्टला करिअर म्हणून निवडले आणि मुंबईतील सोफिया पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
- नानाने केवळ टाईमपाससाठी बॅग बनविण्याच्या आयडियावर काम करण्यास सुरुवात केली.
- त्यांनी यासाठी एक लिफ्टमॅन आणि जीप नीट करणाऱ्याची मदत घेतली. साध्या कॅनवसपासून त्यांनी बॅग बनविण्यास सुरुवात केली.
- तेथेच त्यांना आपल्या डिझायनर स्टोअरच्या मालकाकडून बॅग विकण्याची परवानगी मिळाली.   

 

 

अॅटिट्यूडवाले कोट लिहिण्यास केली सुरुवात
- नीना यांची भेट आपल्या मैत्रिणीचा भाऊ मनोजसोबत झाली. मनोज कपड्याचे प्रदर्शन आणि सेल लावण्याचे काम करायचा.
- नीना यांनी बनविलेल्या बॅग त्यांना खूपच आवडल्या आणि त्यांनी त्या विकायचा निर्णय घेतला. 

- नीना यांना तेव्हा एक बॅग बनविण्यासाठी जवळपास 25 रुपये खर्च येत होता. त्या ही बॅग बाजारात 60 रुपयांना विकत होत्या. अशा रितीने त्यांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त फायदा होता. 

 

 

मायकल जॅक्सन यांच्या डान्सवर कंपनीचे नाव
- तीन वर्षात नीना यांनी बनविलेल्या बॅगांची विक्री जवळपास 10 पट वाढली. त्यामुळे त्यांनी लेदर बॅग बनविण्याचाही प्रयत्न केला.
- त्यांनी सिथेंटिक लेदर बनविण्याचा प्रयत्न केला.
- देशातील वाढत्या मोबाईल खरेदीदारांना पाहून नीना यांनी बेल्ट, वॉलेट आणि दुसऱ्या एक्ससेरीज बनविण्यासही सुरुवात केली.
- नीना मायकल जॅक्सनच्या खूप मोठ्या फॅन आहेत. त्यांनी त्यांच्या बीट इटवरच कंपनीचे नाव ‘बैगिट’ असे ठेवले. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...