आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फरार आहेत ललित मोदी, मुलाने खरेदी केली ही शानदार कार, मुलगी जगते अशी लाईफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ललित मोदीची मुलगी आलिया (डावीकडे), त्यांचा मुलगा रुचिरची नवी फरारी कार (उजवीकडे).... - Divya Marathi
ललित मोदीची मुलगी आलिया (डावीकडे), त्यांचा मुलगा रुचिरची नवी फरारी कार (उजवीकडे)....

मुंबई- देशातून फरार झालेले आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शनिवारी काही काळासाठी बीसीसीआयची अधिकृत वेबसाईट बंद पडली होती. नंतर समजले की, या वेबसाईटवरील मालकी हक्क ललित मोदींच्या नावावर आहे आणि वेळेत त्याचे रिन्यू न केल्याने ती बंद पडली होती. ललित मोदी जगाला आपल्या लग्जरी लाईफस्टाईलसाठी माहित आहेत. अलिशान जीवन जगण्याच्या अंदाजात त्यांची मुलगी आलिया आणि मुलगा रुचिर पित्याला कमी नाहीत. मागील आठवड्यात रुचिरने नवी फरारी खरेदी केल्यानंतर सोशल मीडियात खूप वाहवा मिळवली होती. सोशल मीडियात लोकांनी ललित मोदींवर साधला होता निशाणा....

 

- रुचिर मोदीने पर्पल कलरची McLaren 720S कार घेतली आहे. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर त्याचा फोटो पोस्ट केला. पोस्टनंतर त्याच्या पेजवर खूप कमेंट्स आल्या आहेत. 
- पिता ललित मोदीने सुद्धा त्याची पोस्ट रीपोस्ट केली. त्यांनी लिहले की, 'love my sons new car'. यानंतर लोकांनी त्यावर कमेंट करणे सुरू केले.
- ललित मोदी अनेक लग्जरी कारचे मालक आहेत. रुचिर सुद्धा त्या कारमध्ये दिसतो. त्याच्याजवळ लंडनमध्ये फरारी कार आहे, ज्याच्या नंबर प्लेटवर क्रिकेट लिहले आहे.
- ललित मोदीने काही वर्षापूर्वी आपली पत्नी मीनलला एस्टन मार्टिन कार गिफ्ट केली होती. याशिवाय मोदीजवळ मर्सिडीज बेंज जी 63 एएमजी सह अनेक लग्जरी कार आहेत.
- IPL गैरव्यवहारात नाव आल्यानंतर ललित मोदी फरार आहेत. मुंबईतील एका कोर्टाने त्यांना मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये फरार घोषित केले आहे.

 

मुलगी स्विर्त्झलंडमध्ये घेतेय शिक्षण-

 

- आलिया आपली लाईफ एरदम पापाच्या स्टाईलमध्ये एन्जॉय करते. तिचे सोशल मीडिया अकाउंट पाहिले तर त्यावर स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजातील फोटोज पाहायला मिळतील.

- आलिया सध्या स्विर्त्झलंडमध्ये शिक्षण घेतेय. ती आयपीएल दरम्यान अनेकदा स्टेडियममध्ये दिसली होती.

 

अशी आहे मुलगा रुचिरची लाईफ-

 

- आयपीएलमध्ये सेलिब्रिटीजसमवेत चमकणारा रुचिर मागील काही वर्षापासून फार बदलला आहे. पित्याप्रमाणे त्याला क्रिकेटमध्ये प्रचंड रस आहे. वर्ष 2008 ते 2010 पर्यंत आयपीएल मॅचेसदरम्यान दिसणारा रुचिर आता पिता ललित मोदींसमवेत लंडनमध्ये राहतो.
- त्याने लंडनमधील बिजनेस स्कूलमधून पदवी घेतली आहे. जेथून त्याने बिजनेस मॅनेजमेंटची डिग्री घेतली आहे. आयपीएल पार्टीजमध्ये सेलेब्ससमवेत दिसणारा रुचिर आता मोदी वेन्चर नावाची कंपनी चालवत आहे. हळू हळू तो आपल्या पित्याच्या बिजनेसमध्ये लक्ष घालत आहे. 
- तो सोशल मीडियात खूप अॅक्टिव राहतो, तो अनेकदा पार्टीज आणि कॉलेज लाईफचे फोटो शेयर करतो. या फोटोजमध्ये तो फरारी सारख्या लग्जरी गाड्या आणि प्रायवेट जेटमध्ये फिरताना दिसतो. त्याच्यासमवेत त्याचे फ्रेंड्स सुद्धा फोटोजमध्ये दिसतात. अनेकदा तो इव्हेंट्समध्ये ललित मोदीसमवेत दिसतो.

 

ललित मोदींवर काय आहेत आरोप?

 

- आयपीएलची सुरूवात ललित मोदी यांनीच केली होती. ते 2008 ते 2010 पर्यंत आयपीएलचे कमिश्नर राहिले.
- 2010 मध्ये मोदीवर आयपीएलमध्ये करप्शनचे आरोप लावले. त्यांच्यावर पंजाब आणि राजस्थान या संघाची मालकी देताना फेवर केल्याचे बोलले गेले. तसेच कोची टीमची मालकी देताना गैरव्यवहार केला.
- ललित मोदीने मॉरिशसची कंपनी वर्ल्ड स्पोर्ट्सला आयपीएलच्या अधिकाराचा 425 कोटींना ठेका दिला होता. आरोप आहे की, मोदींनी यात 125 कोटींचे रुपये कमीशन घेतले. 
- ललित मोदींवर आयपीएलमधील गैरव्यवहाराचे आरोप होताच 2010 मध्ये आयपीएल कमिश्नर पोस्ट वरून हटविले.  
- 2010 मध्ये ते ब्रिटनमध्ये पळून गेले. तेव्हापासून भारत सरकार त्यांच्या प्रत्यार्पणाचा प्रयत्न करत आहेत.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ललित मोदीच्या परिवारातील काही चर्चित फोटोज..

बातम्या आणखी आहेत...