आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनाप्रमुखांच्या घरी या कॉन्स्टेबलने पकडला होता साप, अशी मिळाली प्रेरणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुरधीधर जाधव यांनी आतापर्यंत 5 हजार साप पकडले आहेत. - Divya Marathi
मुरधीधर जाधव यांनी आतापर्यंत 5 हजार साप पकडले आहेत.

मुंबई- आपण पोलिस नेहमी अपराध्यांना पकडण्यासाठी पळत असल्याचे पाहत असतो आणि ऐकत असतो. पण मुंबईत एक असा पोलिस कर्मचारी आहे जो सापांमागे पळतो आणि त्यांना पकडतो. मुरलीधर जाधव असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. जाधव हे 2007 पासून हे करत आहेत. आतापर्यंत त्यांनी 5 हजारहून जास्त साप पकडले आहेत. पावसाळ्यात ते रोज 10 ते 15 साप पकडतात.

 

 

शिवसेनाप्रमुखांच्या घरीही पकडला होता साप
- मुरलीधर जाधव यांनी 2014 साली मातोश्रीच्या बाहेर एक अजगर पकडला होता. जाधव यांना मातोश्रीच्या बाहेर एक अजगर असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी लगेच त्याठिकाणी पोहचून हा अजगर पकडून वन विभागाच्या ताब्यात दिला.
- उध्दव ठाकरे यांनीही जाधव यांचे कौतुक केले होते. त्यांनी शिल्पा शिरोडकर, राजेश्वरी सचदेव यांच्या घरातील सापही पकडले आहेत. 

 

 

मोफत करतात हे काम
- जाधव हे या कामासाठी पैसे घेत नाहीत. ते सापाबाबत लोकांच्या मनात असलेले गैरसमज दुर करण्यासाठी प्रयत्न करतात. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...