आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात आज लेवा समाजाचे अधिवेशन; नाराज एकनाथ खडसेंच्या भूमिकेकडे लक्ष!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समाजाचे बडे राजकीय नेतृत्व एकनाथ खडसे यांनी अधिवेशनाची धुरा खांद्यावर घेतली अाहे. त्यामुळे ते समाजाच्या या अधिवेशनात काय राजकीय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागून अाहे. - Divya Marathi
समाजाचे बडे राजकीय नेतृत्व एकनाथ खडसे यांनी अधिवेशनाची धुरा खांद्यावर घेतली अाहे. त्यामुळे ते समाजाच्या या अधिवेशनात काय राजकीय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागून अाहे.

जळगाव- उत्तर महाराष्ट्रातील लेवा पाटीदार समाजाचे राष्ट्रीय महाअधिवेशन यावल तालुक्यातील पाडळसे येथे सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने ३३ वर्षांनंतर समाज प्रथमच एकत्रित आला अाहे. समाजाचे बडे राजकीय नेतृत्व एकनाथ खडसे यांनी अधिवेशनाची धुरा खांद्यावर घेतली अाहे. त्यामुळे ते समाजाच्या या अधिवेशनात काय राजकीय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागून अाहे.
 
लेवा पाटीदार समाजात एकनाथ खडसेंचा शब्द सामाजिक, राजकीयदृष्ट्या प्रमाण मानला जाताे. राज्यात भाजप-सेनेचे सरकार गेल्या चार वर्षांपासून अाहे. सुरुवातीचा एक ते दीड वर्षांचा मंत्रिपदाचा कार्यकाळ साेडला तर उर्वरित दीड-दाेन वर्षांपासून खडसे हे मंत्रिमंडळाच्या बाहेर अाहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा नानाविध कार्यक्रमात त्यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली अाहे. या पार्श्वभूमीवर अापल्या लेवा समाजबांधवांच्या आज हाेणाऱ्या महाअधिवेशनात ते काय राजकीय भूमिका मांडतात? याकडे राज्यभरातील नेतेमंडळींचे लक्ष लागून अाहे. 

 

आजच्या महाअधिवेशनाला देशभरातील 60 हजार समाजबांधव हजेरी लावणार आहेत. त्यासाठी 10 एकर जागेवर मंडप टाकून व्यवस्था करण्यात अाली अाहे. उद्याेग, व्यवसाय, नाेकरीनिमित्त विदेशात असलेल्या समाजबांधवांना निमंत्रित केले आहे. 

 

एकनाथ खडसेंचा समाजात दबदबा- 

 

समाजकारण, राजकारणात लेवा पाटीदार समाजाच्या नेत्यांचा अादरयुक्त दबदबा अाहे.  स्वातंत्र्यसेनानी धनाजी नाना चाैधरी ते अामदार एकनाथ खडसे आदी नेते समाजातील नव्या पिढीची स्फूर्तीस्थाने अाहेत. स्वातंत्र्य अांदाेलनातील गांधी पर्वात समाजातील धनाजी नाना चाैधरींनी स्वातंत्र्याचे लाेण गावागावांत पाेहाेचवले. आता समाजकारणात साडेतीन दशकांपासून एकनाथ खडसे यांनी अापल्या कार्याचा ठसा उमटवला अाहे. त्यांचा शब्द प्रमाण मानला जाताे. काेथळी गाव ते मंत्री हा खडसेंचा जीवन प्रवास भूषणावह वाटताे. त्यांच्या पत्नी मंदाताई जिल्हा दूध संघाच्या चेअरमन अाहेत. महानंदाच्या अध्यक्षा म्हणूनही त्या कार्य करीत अाहेत. सून रक्षा खडसे खासदारकीच्या माध्यमातून व मुलगी अॅड. राेहिणी खडसे या जिल्हा बंॅकेचे कामकाज पाहत आहेत. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...