आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव मोदी एकटाच नव्हे, तर या उद्योगपतींनीही देशाला लावलाय करोडोंचा चूना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीरव मोदी 11 हजार 400 कोटींचा चुना लावून विदेशात पळून गेला. - Divya Marathi
नीरव मोदी 11 हजार 400 कोटींचा चुना लावून विदेशात पळून गेला.

मुंबई- देशातील बॅंकिंग इंडस्ट्रीत देशातील आणखी एक सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. नीरव मोदीने पंजाब नॅशनल बॅंकेला 11 हजार 400 कोटींना चुना लावून विदेशात फरार झाला आहे. पण देशाला लुटणारा व विदेशात पळून जाणारा नीरव मोदी हा काही एकटाच नाही. याआधीही नीरवप्रमाणे काही उद्योगपतींनी करोडोंचा घोटाळा करून विदेशात पलायन केले आहे. या उद्योगपतींच्या विरोधात फ्रॉड, मनी लाँड्रिंग आणि आर्थिक फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. कोण नीरव मोदी?

 

- भारतातील अत्यंत श्रीमंत व्यक्तीपैकी एक असून, त्याचा हिरे निर्यातीमध्ये जगभर दबदबा आहे.
- जगभरातील अनेक सेलिब्रिटींना रत्ने, आभूषणे पुरवणारा बडा व्यापारी म्हणून प्रसिद्ध आहे.
- फोर्ब्सने 2016 मध्ये जाहीर केलेल्या श्रीमंत तरुण व्यक्तींच्या यादीत नीरव मोदीचे नाव होते. 
- नीरव मोदीच्या कंपन्यां व संपत्तीचे मूल्य एकून मूल्य (नेटवर्थ) 1.74 अब्ज डॉलर इतके प्रचंड आहे. 
- फायर स्टार डायमंड कंपनीची संपत्ती 2.3 अब्ज डॉलर इतकी आहे.
- नीरव मोदीचा व्यवसाय मुंबई, दिल्ली, लंडन, न्यूयॉर्क, लास व्हेगास, हवाई, सिंगापूर, बीजिंग, मकाव आदी ठिकाणांहून चालतो. 
- 48 वर्षीय नीरव मोदी बेल्जियममधील शहर ऐंटवर्पमध्ये हि-याचा व्यापार करणा-या परिवारातून येतो.
- नीरवने वॉर्टनमधून फायनान्समधून एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला मात्र तेथे तो फेल झाला. त्यामुळे त्याला हि-यांच्या व्यापारात उतरावे लागले.
- त्याचे कुटुंबिय सुरूवातीपासूनच हिरे व्यवसायात होते. एका इंटरव्यूमध्ये नीरवने सांगितले होते की, तो कधीही हिरे व्यवसायात येऊ इच्छित नव्हता.
- वयाच्या 19 व्या वर्षी तो मुंबईत आपले मामा आणि गीतांजली जेम्सचे चेअरमन मेहुल चौकसी यांच्याकडे आला. त्यांच्याकडेच त्याने हिरे व्यापाराचा बिजनेस समजून घेतला.
- वर्ष 1999 मध्ये त्याने 'फायर स्टार डायमंड' नावाची कंपनी सुरू केली. तसेच नंतरच्या काळात त्याने काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे अधिग्रहण केले. 
- यानंतर त्याने आपले नेटवर्क विदेशांत पसरविण्याचा निर्णय घेतला. तसेच कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चुरिंग फील्डमध्ये पाऊल ठेवले.

 

पुढे स्लाईडद्वारे वाचा, आणखी कोणत्या कोणत्या उद्योगपतींनी देशाला किती कोटींचा लावला चुना.....

बातम्या आणखी आहेत...