आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Valentine Special: मंत्र्यांचा जावई आहे हा IPS, अशी सुरू झाली त्यांची लव्ह स्टोरी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंत्री विजय शिवतारेंची मुलगी ममता हिचा विवाह IPS शिवदीप लांडे यांच्याशी झाला आहे. - Divya Marathi
मंत्री विजय शिवतारेंची मुलगी ममता हिचा विवाह IPS शिवदीप लांडे यांच्याशी झाला आहे.

मुंबई- 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा होत असतो. यानिमित्त आम्ही तुम्हाला एका मराठी IPS च्या लव्हस्टोरीबाबत माहिती देणार आहोत ज्याने एका मंत्र्यांच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला आहे. आम्ही बोलतोय अकोल्यातील शिवदीप लांडे आणि राज्याचे मंत्री विजय शिवतारे यांची कन्या ममता यांच्याबाबत. या दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडमार्फत पार्टीत झाली होती. तेथे या दोघांची भेट झाली पुढे मैत्री व नंतर प्रेमात पडल्यानंतर लग्न केले. दोघांना आता एक मुलगी आहे. शिवदीप लांडे सध्या मुंबईत अॅंटी नारकोटिक्स विभागात डीसीपी पोस्टवर कार्यरत आहेत. 2006 च्या IPS च्या बॅचचे शिवदीप यांनी दहा वर्षे बिहार केडरमध्ये काम केले आहे.

 

अशी सुरू झाली दोघांची लव्हस्टोरी-

 

- इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी व यूपीएससी करण्यासाठी लांडे मुंबईला गेले होते. तेथे त्यांचे फ्रेंड सर्कल मोठे आहे. 
- त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत लांडे मुंबईत येत असत. तेथेच शिपदीपची शिवतारे यांची कन्या ममता हिची ओळख झाली.
-  शिवदीप लांडे बिहारात जबरदस्त कामगिरी करत होते. त्यामुळे इकडे आपल्या महाराष्ट्रातही लांडे यांच्या पराक्रमाच्या बातम्या झळकत होत्या. त्यामुळे मराठी तरूणीही लांडे यांच्या व्यक्तीमत्त्वावर फिदा होत्या. 
- मात्र, ममता व शिवदीप यांची मने जुळली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 
- 2 फेब्रुवारी 2014 रोजी या दोघांचा विवाह मुंबईत पार पडला. आता या दोघांच्या संसारात एका चिमुकलीने आगमन केले आहे.

 

मुंबईतील चाळीत बालपण गेले ममताचे-

 

- पुण्यातील पुरंदरचे आमदार व राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांची एकुलती एक मुलगी ममता हिचा विवाह चार वर्षापूर्वी बिहार पोलिस दलात कार्यरत असलेले व दबंग, सिंघम अशी ख्याती मिळवलेले विदर्भीय पुत्र आयपीएस शिवदीप लांडे यांच्याशी झाला.
- ममता लहानाची मोठी मुंबईत झाली आहे. ममताचे बालपण साधारण व मुंबईतील चाळीत गेले असले तरी पुढे शिवतारे यांनी बांधकाम व्यवसायात उडी घेतली व आपली आर्थिक प्रगती केली. 
- पुढे शरद पवारांच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला मात्र राष्ट्रवादीत काही वर्षे राहिल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 
- शिवसेनेत गेल्यावर ते आमदार झाले व आता मंत्रीही बनले आहेत. शिवतारे यांना दोन मुले व एक मुलगी आहे. 
- दोन्ही मुले बांधकाम व्यवसायत आहेत. तर, मुलगी ममताने आयपीएस शिवदीप लांडे यांच्याशी विवाह केला. 
- बिहार पोलिस दलात 10 वर्षे कार्य केल्यानंतर शिपदीप यांनी आपले सासरे मंत्री शिवतारे यांच्या सांगण्यावरून महाराष्ट्र पोलिस दलात रूजू होण्याबाबत केंद्रीय व राज्याच्या गृहमंत्रालयाकडे अर्ज केला होता. 
- त्यानंतर शिवतारे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे शब्द टाकला. अखेर 2016 मध्ये शिवदीप लांडे यांना तीन वर्षासाठी महाराष्ट्र पोलिस दलाचे केडर मिळाले.

 

बिहारमधील तरूणाई शिवदीप यांच्यावर होती फिदा-

 

- आपल्या दबंग कामगिरीमुळे शिवदीप हे बिहारमधील युवकांच्या गळ्यातील 'ताईत' बनले होते. 
- यादरम्यान, दबंग, सिंघम अशी ओळख निर्माण केली. तरूण-तरूणी त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी ताटकळायचे. 
- त्यांच्या दबंगगिरीने गुन्हेगारी जगताला सळो की पळो करून सोडले. त्याची दखल घेऊन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लांडे यांना पाटण्याचे पोलिस अधीक्षक बनविले होते. 
- त्यानंतर लांडे यांनी तेथील गुंडगिरी, अवैध व्यवसाय, बेशिस्त वाहतूक, टपोरी युवकांच्या टोळ्या मोडून काढल्या. त्यांच्याविरुद्ध त्यांनी धडक मोहीम उघडली. 
- लांडे याच्या या कामगिरीचे सत्ताधारी पक्षच नव्हे, तर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, लोकजनशक्ती पार्टीचे नेते माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीही जाहीर सभांमधून कौतुक केले होते.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, मंत्र्यांची मुलगी ममता व IPS शिवदीप लांडेचे निवडक फोटोज...

बातम्या आणखी आहेत...