मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय जीवनातील वाटचाली इतकीच त्यांच्या वैयक्तिक जीवनाची अनेकदा चर्चा होत असते. देवेंद्र आणि अमृता फडणवीस हे नागपूरमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचे स्वप्न बाळगून आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांची रेशीमगाठ कशी जुळली याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
देवेंद्र फडणवीस वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी नागपूरचे महापौर बनले होते. देशातील सर्वात तरूण महापौर म्हणूनही त्यांचा गौरव झाला होता.
पहिल्या भेटीत म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री म्हणजे काजोल. ते जेव्हा पहिल्यांदाच अमृता यांना भेटले होते तेव्हा, 'तू काजोल सारखी दिसतेस, असे म्हणतच देवेंद्र यांनी त्यांना प्रपोज केले होते.
नागपूरच्या नामवंत डॉक्टरांची कन्या
आमदार म्हणून दुसर्यांदा निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे लग्न झाले. त्यांचा विवाह हा नागपूरमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. त्यांच्या पत्नी अमृता या नागपूरचे नामवंत डॉ.चारू रानडे आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. शरद रानडे यांच्या कन्या. देवेंद्रचे निकटवर्तीय आणि मित्र शैलेश जोगळेकर यांच्या घरी देवेंद्र आणि अमृता यांची भेट झाली होती, असे शैलेश सांगतात. दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. देवेंद्र आणि अमृता यांना देविजा नावाची कन्या आहे.
कॅन्सर रोग केंद्र स्थापित करण्याचे स्वप्न
गेल्या काही वर्षांपासून देवेंद्र आणि अमृता नागपूरमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचे स्वप्न बाळगून आहेत. संघ परिवाराची संस्था असलेल्या डॉ. आबाजी थत्ते या संस्थेच्या माध्यमातून वर्धा मार्गावर जामठा येथे ही योजना सत्यात उतरवण्याचा त्यांचा विचार आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अमृता यांच्या विषयी...