आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधु मंगेश कर्णिक यांना विंदा करंदीकर पुरस्कार; मराठी विज्ञान परिषदेचाही गाैरव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला अाहे. तसेच पुणे येथील वरदा प्रकाशन संस्थेला श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार, अविनाश बिनीवाले यांना डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार तर मराठी विज्ञान परिषद संस्थेला कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार जाहीर करण्यात अाला. मराठी भाषा दिनी २७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात या पुरस्काराचे वितरण हाेणार अाहे. मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  


ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी रोजी असणारा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून याच दिवशी मराठी भाषा विभागामार्फत दरवर्षी या चार सर्वोच्च पुरस्कारासह विविध साहित्य प्रकारांचे ३५ राज्य वाङ्मय पुरस्काराचे वितरणही करण्यात येत आहे. याच कार्यक्रमात गेल्या वर्षभरातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मराठी साहित्यिकांचा सन्मानही करण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...