आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018: शेंद्रा, लातूर, नांदेड, हिंगाेलीत 4,925 कोटींची गुंतवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक परिषदेत गुंतवणूकदारांनी मराठवाड्याला सर्वाधिक पसंती दिली अाहे. मराठवाड्यात मेट्राेसाठी लागणाऱ्या डब्यांच्या (काेच फॅक्टरी) निर्मितीच्या प्रकल्पासह अाैरंगाबाद, नांदेड, हिंगाेली या जिल्ह्यांमध्ये ४,९२५ काेटी रुपयांचे गुंतवणूक करार या परिषदेत करण्यात अाले. सोमवारी कोरियाच्या ह्युसंग कंपनीशी शेंद्र्यातील प्रकल्पासाठी ४ हजार कोटींचा करार करण्यात अाला होता. 


वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर सुरू असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन २०१८ जागतिक गुंतवणूक परिषदेचा समारोप मंगळवारी झाला. या माध्यमातून राज्यात १२ लाख १०,४६४ कोटी रुपये गुंतवणुकीचे ४०६ सामंजस्य करार झाले. त्यातून ३६ लाख ७७,१८५ जणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. 


मुख्यमंत्री म्हणाले की, परिषदेत मराठवाड्याला गुंतवणूकदारांनी जास्त प्राधान्य दिले. मुंबई, पुणे, नाशिक या भागात गुंतवणूक करण्यासाठी उद्याेजक नेहमीच तयार असतात, मात्र मराठवाडा-विदर्भात गुंतवणुकीसाठी उद्याेगांचे मन वळवणे जास्त महत्त्वाचे हाेते. 


मॅग्नेटिक महाराष्ट्रातील सादरीकरणाच्या माध्यमातून मराठवाड्यात गुंतवणूक अाकर्षित करण्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले. या भागात उद्याेग अाल्यास त्यादृष्टीने पूरक-पाेषक वातावरण तयार हाेऊन राेजगाराला चालना मिळण्यास मदत हाेईल. तसेच मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 


रेल्वेमंत्री पीयूष गाेयल म्हणाले, ३१ जानेवारीला लातूर प्रकल्पाबाबत प्राथमिक चर्चा झाली. त्यानंतर अवघ्या दहा दिवसात मुख्यमंत्र्यांनी त्याला मूर्तरूप देऊन प्रकल्पासाठी रेल्वेला एमअायडीसीने जमिन हस्तांतरीत केली. 


अमरावती टेक्स्टाइल हब
अमरावतीची अाेळख अाता टेक्स्टाइल हब म्हणून हाेऊ लागली अाहे. फार्म टू फॅशननंतर पलक इंडस्ट्री, ह्युसुंग, निर्वाण सिल्क, सुपर ब्ल्यू डेनिम, व्हेरिटाे टेक्सटार्इल अादी कंपन्या जवळपास १,६०० काेटी रुपयांची गुंतवणूक करणार अाहेत. त्यामुळे या शहराची लवकरच वाटचाल निर्यातीच्या दिशेने हाेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बाेलताना सांगितले.


लातूरच्या काेच फॅक्टरीसाठी रेल्वेसोबत ६०० कोटी रुपयांचा करार
- रेल्वे मंत्रालय-एमअायडीसीत लातूर येथे मेट्राे व रेल्वेच्या डब्यांची निर्मिती करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ६०० काेटी रुपयांचा करार झाला अाहे. येथे मेट्राेसाठी लागणाऱ्या डब्यांची निर्मिती केली जाणार आहे. भविष्यात ते निर्यात करण्याचे उद्दिष्ट अाहे. 
- ०२ हजार हेक्टर जागा
- ६०० काेटी पहिल्या टप्प्यात गुंतवणूक 
- १५ हजार थेट राेजगार 
- ४५ हजार अप्रत्यक्ष राेजगार उपलब्ध होणार


बीड, उस्मानाबादला लाभ
या कारखान्यामुळे लातूरसह बीड, उस्मानाबादमधील चित्र बदलून १५ हजार थेट राेजगारनिर्मिती, तर ४५ हजार अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती हाेऊ शकेल, असे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


‘नाे इंडस्ट्री झाेन’ हिंगोलीतही येणार उद्योग
हिंगोली :
येथे शिरूर अॅग्राेकडून १२५ काेटी रुपयांची गुंतवणूक होईल. अाजपर्यंत हिंगाेलीमध्ये एकही उद्याेग कार्यरत नव्हता. राज्याच्या अार्थिक सर्वेेक्षणात हिंगाेली हा ‘नाे इंडस्ट्री झाेन’ म्हणून अाेळखला जात हाेता.
नांदेड : इंडिया अॅग्राे अनाज लिमिटेड या कंपनीने नांदेडमध्ये सरकारसोबत २०० काेटी रुपयांच्या गंुतवणुकीचा करार केला आहे. 


विदर्भात वस्त्रोद्योग हब होणार
गडचिराेली :
लाॅइड मेटलकडून ७०० काेटी रुपयांची गुंतवणूक हाेणार अाहे. 
नंदुरबार : जिनस पेपर अँड बाेर्डकडून ७०० काेटींची गुंतवणूक हाेणार अाहे. 
अमरावती : अत्याधुनिक वस्त्राेद्याेग हब तयार करण्यासाठी टेक्नाेक्राफ्ट इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने १८३ काेटींच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला. 

बातम्या आणखी आहेत...