आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी खासदार संजय पाटील यांची नियुक्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांची तर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी खासदार संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार चैनसुख मदनलाल संचेती तर उपाध्यक्षपदी आमदार डॉ. सुनील पंजाबराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

 

गेली साडे तीन वर्ष रखडलेल्या महामंळावरील नियुक्त्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्य शासनाने विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार चैनसुख मदनलाल संचेती यांची उपाध्यक्षपदी आमदार डॉ. सुनील पंजाबराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऊर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी 'दैनिक पुढारी'चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे समजल्या जाणा-या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी सांगलीचे खासदार संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी दोन मंडळाचे अध्यक्ष व दोन महामंडळाच्या उपाध्यक्षपदांच्या नियुक्तीस मान्यता दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिल्याप्रमाणे या चार पदांच्या नियुक्त्या घोषित करण्यात येत असून, त्यानुसार आवश्यक पुढील कारवाई करण्यात येत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...