आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजपूत संघटनेत फूट; महाराष्ट्रात करणी सेनेचा ‘पद्मावत’विरोध मागे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करणी सेनेच्या विरोधामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणा या राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. - Divya Marathi
करणी सेनेच्या विरोधामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणा या राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.

मुंबई/ जयपूर- पद्मावत चित्रपटाला हिंसक विरोध करणाऱ्या राजपूत संघटनेत आता फूट पडू लागली आहे. शुक्रवारी मुंबईत करणी सेना नावाखाली चालणाऱ्या एका संघटनेने चित्रपटाला असलेला विरोध बिनशर्त मागे घेत असल्याची घोषणा केली. दरम्यान, निदर्शनांमध्ये आघाडीवर राहिलेले लोकेंद्रसिंह कालवी यांनी या वृत्ताचे खंडन करून या नावाने देशभर आठ संघटना कार्यरत असल्याचे सांगून आपला चित्रपटाला असलेला विरोध कायम असल्याचे ठासून सांगितले.


श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महाराष्ट्र शाखेने निर्मात्यांना आपल्या लेटरहेडवर लिहिलेल्या पत्रात चित्रपटामध्ये आक्षेपार्ह काहीच नसल्याचे म्हटले होते. संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेंद्रसिंह कटार यांची या पत्रावर स्वाक्षरी होती. पत्रात राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात चित्रपट प्रदर्शित व्हावा म्हणून मदत करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. विशेष म्हणजे कालवी यांच्या संघटनेचे नाव श्री राजपूत करणी सेना असे आहे. तर, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष  सुखदेवसिंह गोगामेडी यांनी असे पत्र देणाऱ्यांना संघटनेतून काढून टाकण्यात आल्याचे म्हटले आहे.


राष्ट्रीय अध्यक्षाच्या सांगण्यावरुनच आम्ही चित्रपट पाहिला
- राष्‍ट्रीय राजपूत करणी सेनेचे (महाराष्‍ट्र विभाग) राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष योगेन्‍द्र सिंह कटारा यांनी एक वक्तव्य जारी करत आपला विरोध मावळला असल्याचे सांगितले आहे. 
- त्यांनी एक पत्र लिहिले आहे त्यात म्हटले आहे की,  करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामाडी यांच्या सांगण्यावरुन त्यांनी हा चित्रपट पाहिला. त्यात राजपुतांचे शौर्य दाखवले आहे. 

 

अन्य राज्यांमध्ये चित्रपट प्रदर्शित व्हावा
- पत्रात लिहिले आहे की, करणी सेनेने अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला नव्हता. पण आम्ही आता त्यांना मदत करु. चित्रपट पाहिल्यावर प्रत्येकाला या शौर्यावर गर्वच वाटेल. 

 

डुप्लीकेट करणी सेनेने विरोध मागे घेतल्याचे कालवींचे वक्तव्य 
- महाराष्ट्रात करणी सेनेने विरोध मागे घेतल्यावर याबाबत करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कालवी याबाबत म्हणाले, ही त्यांची करणी सेना नाही.
- कालवी म्हणाले, हा गट डुप्लीकेट आहे. आम्ही याबाबत केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...