आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याच्या प्रकरणातून काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांची सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याच्या प्रकरणातून काँग्रेसचे नेते  कृपाशंकर सिंह यांना एसीबीने दोषमुक्त  केले आहे. 2012 मध्ये एसीबीने कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी करताना कोर्टाने त्यांना दोषमुक्त केले.

 

 

कोणत्याही लोकनेत्याच्या विरोधात खटला चालवण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असते. मात्र, या प्रकरणात ती घेण्यात आली नसल्याने कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात खटला चालवताच येणार नसल्याचे त्यांच्या वतीने एसीबी कोर्टात सांगण्यात आले. आरोपपत्रानुसार कृपाशंकर यांच्याविरोधात कोणतेही सबळ पुरावे सादर करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरली. त्यामुळे कृपाशंकर यांना त्यांच्या विरोधात एसीबीने दाखल केलेल्या खटल्यातून दिलासा मिळाला आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती