आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रज्ञा, पुरोहित मोक्कातून सुटले; दहशतवादाचा खटला चालणार - विशेष एनआयए कोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मालेगाव २००८ मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह ५ जणांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच मोक्कासह इतर कलमांतून मुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध विशेष राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कोर्टात दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत खटला चालणार आहे. सर्व आरोप रद्द करण्याचे अपीलही कोर्टाने फेटाळले आहे. 


राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष कोर्टाचे न्यायाधीश एस.डी. टेकाळे यांनी बुधवारी साध्वी प्रज्ञा, पुरोहित आणि इतरांविरुद्ध बेकायदा कारवाया प्रतिबंधक अधिनियम (यूएपीए) आणि अायपीसीच्या तरतुदीअंतर्गत गुन्हेगारी कटाचे आरोप निश्चित केले आहेत. कोर्टाने सर्व आराेपींना १५ जानेवारीला हजर राहण्याचे दिले आहेत. न्या. टेकाळे म्हणाले, आरोपींविरुद्ध प्राथमिकदृष्ट्या पुरावे उपलब्ध आहेत. आता त्यांना दहशतवादप्रतिबंधक कायद्यान्वये खटल्याला समोरे जावे लागेल. विशेष म्हणजे एनआयएने साध्वी प्रज्ञाविरुद्ध पुरावे नसल्याचे म्हटले होते. मात्र त्यांची मोटारसायकल या स्फोटासाठी देण्यात आली होती. यामुळे त्यांचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही, हा एनआयएचा दावा मान्य करता येत नाही, असेही न्या. टेकाळे म्हणाले. 


> साध्वी प्रज्ञािसंहला क्लीन चीट देणाऱ्या एनअारएला काेर्टाचा झटका


यांच्यावर खटला 
साध्वी प्रज्ञा, पुरोहितसह सुधाकर द्विवेदी, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी आणि अजय राहिरकर यांच्याव खटला चालेल. जगदीश म्हात्रे व राकेश धावडेवर फक्त शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत खटला चालेल. 


या कलमांतर्गत खटला चालणार
>यूएपीए: कलम १६ दहशतवादी कृत्य व कलम १८ (गुन्हेगारी कट)
>आयपीसी : कलम १२० ब - गुन्हेगारी कट रचणे, कलम ३०२ - खून, कलम ३०७ - खुनाचा प्रयत्न,  कलम ३२६ – हेतूपूर्वक जखमी करणे.


हे तीन आरोपी दोषमुक्त 
एनआयए कोर्टाने श्याम साहू, शिवनारायण कुलसांग्रा आणि प्रवीण तकलकी या तीन आरोपींना सर्व आरोपांतून दोषमुक्त केले आहे. 

 

साध्वी प्रज्ञा यांना बाईकची होती माहिती
- कोर्ट म्हणाले साध्वी प्रज्ञा यांना बॉम्बस्फोटातील दुचाकीचा वापर कशासाठी होणार याची साध्वी प्रज्ञाला कल्पना होती, त्यामुळे साध्वी प्रज्ञाची कटाच्या आरोपातून मुक्त करता येणार नाही.

- कोर्टाच्या आदेशानंतर आता साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यावर आपीसीच्या कलम 120 B , 302, 307, 304, 326 , 427, 153 A अन्वये आणि कट रचल्याच्या आरोपाखाली खटला चालणार आहे.

- यापूर्वी सोमवारी मुंबई हायकोर्टाने लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि समीर कुलकर्णी यांची याचिका निकालात काढील त्यांनी यूएपीए अंतर्गत राज्य सरकारकडुन चालविणाऱ्यात येणाऱ्या खटल्याच्या परवानगीला आव्हान दिले होते. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...