आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भर बाजारात तो करत होता तलवारीने वार, लोक पाहत राहिले तमाशा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वार करण्यात आलेली व्यक्ती मदतीसाठी ओरडत होती तर आरोपी सपासप वार करत होता. - Divya Marathi
वार करण्यात आलेली व्यक्ती मदतीसाठी ओरडत होती तर आरोपी सपासप वार करत होता.

मुंबई- वाशिंद रेल्वे स्थानकाजवळ एक व्यक्तीने आपल्या शेजाऱ्यावर भर बाजारात तलवारीने वार केले. या व्यक्तीला संशय होता की त्याच्या शेजाऱ्याचे त्याच्या पत्नीशी अनैतिक संबध आहेत. त्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. भर बाजारात घडलेल्या या घटनेचे काही जणांनी आपल्या मोबाईलवर चित्रीकरणही केले आहे. 

 

मित्राने सांगितले होते अफेअरबाबत
- बाळा दळवी (वय 43) नावाच्या व्यक्तीने संतोष कोल्हेकर (वय 45) नावाच्या व्यक्तीवर रविवारी सायंकाळी वाशिंद रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या चौकात हल्ला केला.

- पोलिसांच्या तपासात समोर आले की, संतोष आणि बाळा हे दोघे शेजारी आहेत. ते दोघेही भाजी विकण्याचे काम करतात. रविवारी बाळाला त्याच्या काही मित्रांनी सांगितले की, त्यांनी संतोष आणि बाळाच्या बायकोला अनेक वेळा एकत्र पाहिले आहे. 

- हे समजल्यावर संतप्त झालेल्या बाळाने संतोषवर भर बाजारात तलवारीने वार केले. 
- बाळाच्या हातात तलवार पाहिल्यावर संतोष त्याची माफी मागत होता. पण बाळा काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तो संतोषवर सपासप वार करत होता.

- या घटनेत गंभीर जखमी झाल्याने आणि रक्तस्त्राव झाल्याने संतोष चक्कर येऊन जमिनीवर पडला. त्यामुळे बाळाला त्याचा मृत्यू झाला असे वाटले आणि तो तेथून निघून गेला. गंभीर जखमी झालेल्या संतोषला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

- घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी बाळाला अटक केली आहे. तर संतोषची स्थिती अद्यापही गंभीर आहे.
- पोलिस निरीक्षक गंगाराम वाळवी यांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली असू त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे. संतोषच्या अंगावर आठ ते 10 वार केल्याच्या खुणा आहेत. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...