आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरज पडल्यास पर्रीकरांवर अमेरिकेत उपचार, PMO कडून गडकरींवर सर्व जबाबदारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनोहर पर्रीकर यांच्यावर सध्या स्वादुपिंडाच्या गंभीर आजारावर मुंबईतील लिलावती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. - Divya Marathi
मनोहर पर्रीकर यांच्यावर सध्या स्वादुपिंडाच्या गंभीर आजारावर मुंबईतील लिलावती रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईत- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर सध्या स्वादुपिंडाच्या गंभीर आजारावर मुंबईतील लिलावती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या आजारपणावर केंद्र सरकारसोबतच भाजपही लक्ष ठेऊन आहे. सध्या तरी पर्रीकरांवर मुंबईतच उपचार करण्यात येणार आहेत. त्यांच्यावर सर्वोत्तम उपचार होण्यासाठी अमेरिकेतील तज्ञ डॉक्टरांना मुंबईत पाचारण केले जाणार आहे. तसेच गरज पडल्यास त्यांना उपचारासाठी अमेरिकेतही हलविले जाऊ शकते असे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे. अमेरिकेत स्वादुपिंडाच्या आजारावर चांगल्या प्रकारे उपचार होतात त्यामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान, केंद्र सरकारकडून पर्रीकरांच्या तब्बेतीवर बारीक लक्ष ठेवण्याची जबाबदारी ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सोपविली आहे. पर्रीकरांची आपल्या सर्वांना गरज....

 

- गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांनी म्हटले आहे की, आम्हाला पर्रीकरांची खूप गरज आहे. आम्ही त्यांच्यासाठी जे काही शक्य आहे तो सर्व करू. गरज पडली तर आम्ही त्यांना अमेरिकत उपचारासाठी नेऊ.
- सोमवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पर्रीकर यांची लिलावतीत जाऊन तब्बेतीची विचारपूस केली. यावेळी दोन्ही नेत्यांत 10-15 मिनिटे बातचित झाली.
- रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांनी लिलावतीत जाऊन पर्रीकरांची तब्बेतीची विचारपूस केली होती.
- केंद्र सरकार व पीएमओ पर्रीकरांच्या तब्बेतीबाबत लिलावती रूग्णालयाच्या सातत्याने संपर्कात आहे. नितीन गडकरी यांच्यावर पंतप्रधान मोदींनी संपूर्ण जबाबदारी टाकली आहे.

 

लढाऊ पर्रीकर आजारपणातून बाहेर येण्याची सर्वांनाच आशा-

 

- अमेरिकेतील आरोग्य तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे. त्यातून स्वादूपिंडाशीसंबंधित आजार बरे झाल्याची अमेरिकेत अनेक उदाहरणे आहेत. 
- त्यामुळे भाजप आणि केंद्र सरकारकडून पर्रीकरांना आजारपणातून बाहेर करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. 
- त्यामुळेच सध्या लिलावतीत उपचार सुरू ठेऊन अमेरिकेतील तज्ञांना मुंबईत पाचारण करण्यात येईल. तसेच त्यांच्या सल्ल्यानुसार अमेरिकेला हलविण्याची गरज व्यक्त केली तर त्यांना अमेरिकेतही उपचारासाठी नेण्यात येऊ शकते. 
- पर्रीकरांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत असून, त्यांच्या कुटुंबियांच्या परवानगीनंतर योग्य निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात येत आहे.
- पर्रीकरांनी संरक्षण मंत्री म्हणून काम केले आहे. ते लढाऊ बाण्याचे आहेत. देशभर त्यांचे हितचिंतक आहेत. त्यामुळे ते बरे होऊन पुन्हा राज्याचे दमदार नेतृत्व करतील, अशी आशा गोवाकर करत आहे.

 

विधानसभेचे कामकाज केवळ 4 दिवस-

 

- पर्रीकर यांची ढासळती तब्बेत पाहता गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 33 दिवसावरून केवळ 4 दिवसाचे केले आहे.
- मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत सुदीन ढवळीकर यांना सभागृहाचा नेता तर आमदार फ्रान्सिस डिसूजा यांना विधानसभेतील भाजपचा गटनेता निवडले आहे. काँग्रेसने अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करू नये असे म्हटले आहे.

 

कॅन्सर असल्याचे वृत्त दिल्याने पत्रकाराला अटक-

 

- गोवा पोलिसांनी पर्रीकर यांना कॅन्स असल्याचे खोटे वृत्त दिल्याने एका स्थानिक पत्रकाराला अटक केली आहे.
- त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे की, त्यानेच मनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा कॅन्सर असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले.
- भाजप नेता सुनील देसाई यांनी याप्रकरणी गोव्यातील पौंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
- रविवारी लिलावती रूग्णालयाने एक निवेदन जारी करत पर्रीकर यांना कोणताही गंभीर आजार नसल्याचे म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...