आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदींकडून मनोहर पर्रीकरांच्या तब्बेतीची विचारपूस, स्टेज-4 कॅन्सरचे निदान?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची रविवारी रात्री उशिरा लिलावतीत जाऊन तब्बेतीची विचारपूस केली. - Divya Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची रविवारी रात्री उशिरा लिलावतीत जाऊन तब्बेतीची विचारपूस केली.

मुंबई- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना स्टेज-4 चा स्वादुपिंडाचा कर्करोग (Pancreatic Cancer) असल्याचे वृत्त मुंबईतील एका पोर्टलने दिले आहे. पर्रीकर यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर गेल्या चार दिवसापासून मुंबईतील लिलावती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची रविवारी रात्री उशिरा लिलावतीत जाऊन तब्बेतीची विचारपूस केली.

 

पर्रीकर यांना गुरूवारी (15 फेब्रुवारी) पोटदुखीच्या त्रासामुळे रूग्णालयात भरती करण्यात आले होते. तसेच त्यांना अन्न विषबाधा (फूड पॉयजन) झाल्याचे सांगण्यात येत होते. तसेच लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळेल व 19 फेब्रुवारीपासून गोव्या विधानसभेच्या होणा-या अधिवेशनात भाग घेतील असे सरकारी सूत्रांनी म्हटले होते.

 

मात्र, पर्रीकर यांचा आजार गंभीर स्वरूपाचा असून, ते चौथ्या टप्प्यातील स्वादुपिंड कर्करोगाने पीडित असल्याचे लिलावती रूग्णालयातील सूत्रांच्या हवाल्याने 'मुंबई लाईव्ह' या वेबपोर्टलने वृत्त दिले आहे. मात्र, पर्रीकर यांच्यावर सध्या कोणत्याही प्रकारची सर्जरी करण्यात येणार नसल्याचे कळते. त्यांना डिस्चार्ज कधी मिळणार व गोव्यात कधी परतणार याबाबत कोणतेही माहिती पुढे आलेली नाही. गोवा विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून (19 फेब्रुवारी) सुरू होत आहे.   

 

मनोहर पर्रीकरांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 दिवस?

 

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये स्वादूपिंडाच्या विकारावर उपचार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर गोवा विधानसभा सभापती प्रमोद सावंत यांनी सभागृह सल्लागार समितीची सोमवारी बैठक बोलावली आहे. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु होणार असून पुढचे 22 दिवस चालणार आहे. मात्र मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ठीक नसल्याने अर्थसंकल्प मंजूर करून अधिवेशन 3 दिवसात संपवण्याचा विचार सुरू आहे.

 

सभापती सोमवारी होणा-या सभागृह सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती उपसभापती मायकल लोबो यांनी दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे निमार्ण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी भाजपच्या सर्व आमदारांची उद्या सकाळी 10.30 वाजता आपात्कालीन बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 दिवसांवरुन 3 दिवसांचे करावे अशी मागणी केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...