आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्चा हिवाळी अधिवेशनावर धडकणार, चंद्रकांत पाटील फुट पाडत असल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/पुणे- नागपुरमध्ये 18 डिसेंबरला मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. गनिमी काव्याने सरकारला धडा शिकवण्याचा इशारा मोर्चेकऱ्यानी दिला आहे. 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने नागपूरचे अधिवेशन पेटवले असतानाच आता मराठा क्रांती मोर्चाची यात भर पडणार आहे. सरकारने स्थापित केलेल्या मंत्र्याच्या उपसमितीच्या माध्यमातून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील मोर्च्यात फूट पाडत आहेत, असा आरोप करत मराठा क्रांती मोर्चा येत्या 18 डिसेंबरला नागपुरात धडकणार आहे. गनिमी कावा करून सरकारला धडा शिकवणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला. ते पिंपरी-चिंचवड येथे तातडीची पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

मराठा समाजासाठी सरकारने मंत्र्यांची उपसमिती स्थापन केली आहे. या माध्यमातून मंत्री चंद्रकांत पाटील हे वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजाची दिशाभूल करत आहेत आणि समाजामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत.चंद्रकांत पाटील हे मराठा समाजाच्या चळवळीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असून राज्यातील पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर येथील काही मराठा समाजातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मराठा समाजाच्या मराठा क्रांती मोर्च्यात फूट पाडत असून मीच मराठा समाजाच्या नेता आहे, असे भासवण्याचे ते प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर समाजाची चळवळ मोडीत काढण्याचा घाट घालत आहेत. म्हणून समाजाच्यावतीने चंद्रकांत पाटील यांना उपसमिती मधून हटवण्यात यावे, अशी मागणी यावेळी
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केली आहे. या पत्रकार परिषेदेस मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आबा पाटील, रमेश केरे-पाटील, रविंद्र काळे-पाटील, ॲड. संतोष सुर्यराव, सचिन गवांदे आदी उपस्थित होते.

   

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...