आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी लेखक विनय हर्डीकरांनी अाणीबाणीतील बंदीवानांना दिलेली पेन्शन नाकारली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अाणीबाणीविरुद्ध सत्याग्रह केल्याप्रकरणी १९७६ मध्ये येरवड्यात तुरुंगवास भाेगलेले ज्येष्ठ लेखक विनय हर्डीकर यांनी अाणीबाणीतील बंदीवानांना सरकारने दिलेली पेन्शन नाकारली. ज्या शिवसेनेने अाणीबाणीच्या निर्णयाचे समर्थन केले ती शिवसेना अाज भाजपसाेबत सत्तेत अाहे.

 

त्यामुळे या सरकारचा पेन्शनबाबतचा निर्णय नैतिकतेला धरून नाही, असे त्यांनी सांगितले. हर्डीकर यांनी १९७९ मध्ये अाणीबाणीविरुद्ध ‘जनांचा प्रवाहाे चालला’ हे पुस्तक लिहिले हाेते. हर्डीकर म्हणाले, अाणीबाणीच्या काळात इतरही कारणांवरून काही लाेकांना अटक केली हाेती. जातीय संघटनांचे लाेकही अटकेत हाेते. नक्षलींनाही ताब्यात घेण्यात अाले हाेते. मग सरकार त्यांनाही पेन्शन देणार का?’

 

बातम्या आणखी आहेत...