आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- आज आम्ही तुम्हाला मुंबईत राहणाऱ्या निशा कुंजू विषयी माहिती देणार आहोत. निशा मागील अनेक वर्षांपासून मुंबईत प्राण्यांसाठी काम करत आहे. तिने आतापर्यंत 20 हजारहून अधिक प्राण्याचे जीवन वाचवले आहे. तिला यासाठी अनेक राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.
अशी मिळाली प्रेरणा
- निशाला बालपणापासूनच प्राण्यांची आवड होती. तिचे शिक्षणही मुंबईत झाले आहे.
- ती एक दिवस घरी परतत असताना तिने पाहिले की काही कावळे एका पोपटावर हल्ला करत आहेत. तिने आपल्या भावाच्या सहाय्याने त्या कावळ्यांना परतवुन लावले.
- तिने त्या पोपटावर उपचारही केले पण ती त्या पोपटाचे प्राण वाचवू शकली नाही. तिथेच तिने प्राण्यांवर उपचार करण्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.
- कॉलेजमध्ये असताना ती मेनका गांधी यांच्या संस्थेसोबत काम करु लागली. 2005 मध्ये तिने स्वत:ची प्लॅन्ट अँन्ड अॅनिमल वेलफेयर सोसाइटी(PAWS) सुरु केली.
- सुरुवातीला तिच्यासोबत काही मित्र होते. आता तिच्यासोबत जवळपास 150 जण काम करत आहेत.
पुढील स्लाईडवर आणखी माहिती आणि फोटो
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.