आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसे, देशमुखांची समजूत घालू, पण राणेंबाबत अवघड प्रश्न मला विचारू नका- चंद्रकांतदादा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही नारायण राणेंबाबत विचारण्यापूर्वी मीच उठतो, असे म्हणत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषद गुंडाळली. - Divya Marathi
तुम्ही नारायण राणेंबाबत विचारण्यापूर्वी मीच उठतो, असे म्हणत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषद गुंडाळली.

अहमदनगर- एकनाथ खडसे, आशिष देशमुख ही घरातीलच मंडळी आहेत. प्रेमाने त्यांची समजूत काढली जाईल. अहमदनगर शहरातील उड्डाणपूल होणारच, पण तुम्ही आता मला अवघड विचारू नका. तुम्हाला उत्सुकता असलेल्या प्रश्नावर मी काहीच बोलणार नाही. तुम्ही नारायण राणेंबाबत विचारण्यापूर्वी मीच उठतो, असे म्हणत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषद गुंडाळली. 

 

खासदार दिलीप गांधी यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारने मंजूर केलेल्या १७ कोटींच्या बाह्यवळण रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाला प्रारंभ करण्यासाठी मंत्री पाटील नगरला आले होते. पत्रकार परिषदेस खासदार गांधी, पालकमंत्री राम शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, उपमहापौर श्रीपाद छिंदम उपस्थित होते. 

 

पाटील म्हणाले, पूर्वी राज्यात अवघे ५ हजार किलोमीटर लांबीचे राज्य महामार्ग होते. आता राज्य महामार्गात २२ हजार किलोमीटर रस्त्यांचा समावेश केला आहे. यासह राज्यात तीन, चार आणि सहापदरी रस्त्यांची कामे सुरू असून येत्या तीन वर्षांत ३८ हजार ५०० किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होतील. लोकप्रतिनिधींनी ठेकेदारांना त्रास न देता गुणवत्तेचे रस्ते करून घ्यावेत, असा टोलाही त्यांनी लावला. नगर जिल्हा विभाजनाबाबत समितीचा अहवाल सरकारकडे आला आहे. पालकमंत्री शिंदे यांनी जनतेची भावना बोलून दाखवली. जिल्हा विभाजनाबाबत सरकार सकारात्मक आहे, असे पाटील यांनी सांगितले. नगरचा उड्डाणपूल नक्की होणार आहे, असेही ते म्हणाले. 

 

मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या न्यायालयात आहे, असे सांगून पाटील म्हणाले, छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास कार्यक्रमातून मराठा तरूणांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी चार महिने उशीर झाला. २००८-०९ मध्ये अनेक खात्यांची बोगस कर्जमाफी झाली. ती अजून वसूल नाही. ते टाळण्यासाठी उशीर झाला. आतापर्यंत ३२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हजार कोटी जमा झाले आहेत. २५ लाख खातेदारांची बँकांमार्फत तपासणी सुरू आहे. त्यांचे पैसेही आयसीआयसीआय बँकेकडे वर्ग केले आहेत. कर्जमाफीमुळे शेतकरी खूष आहेत, असे त्यांनी सांगितले. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, भाजपचा राणेंना ठेंगा, मंत्रिपद मिळणार नसल्याचे स्पष्ट.....

बातम्या आणखी आहेत...