आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरं बोलायला व वस्तूस्थिती सांगायला आजकाल मंत्री घाबरतात- एकनाथ खडसेंचे वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील मंत्री आजकाल काही बोलायला घाबरतात असे वक्तव्य भाजपात नाराज चाललेले नेता एकनाथ खडसे यांनी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. सोबतच भाजप आणि महाराष्ट्र सरकारने काही चांगल्या योजना सुरू केल्याबाबत कौतूकही केले.

 

खडसे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक बातचित करताना सांगितले की, ‘मंत्री आणि पार्टी कार्यकर्ता आदेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहतात. मात्र, अशी काही परिस्थितीबाबत बोलल्यास आपण अडचणीत येऊ व त्याचे खापर आपल्यावरच फुटेल या भीतीने ते बोलायला घाबरतात.

 

खडसे यांनी 2016 मध्ये पिंपरी-चिंचवडमधील एमआयडीसी जमिन गैरव्यवहारात मंत्रिपदाचा गैरवापर करत हितसंबंध जोपासल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना महसूल मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. खडसे सध्या आपले राजकीय पुनर्वसन व्हावे यासाठी धडपडत आहेत. त्याचमुळे गेली काही दिवस फडणवीसांसह पक्षावर दबाव आणत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...