आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंच्या सुनेचे मराठवाड्याशी आहे असे नाते; बोरुडेंच्या नातेसंबंधाचे धागे बीडमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/बीड- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा सोमवारी मुंबईत साखरपुडा झाला आणि अंबाजोगाईचे मुंदडा आणि ठाकरे यांच्यात देखील नात्याचा धागा तयार झाला. राज ठाकरे यांच्या सून मिताली या दिवंगत नेत्या विमल मुंदडांच्या सुनबाई नमिता यांच्या सख्ख्या मामेबहीण असल्याची माहिती समोर आली आहे. 

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित आणि मिताली यांच्या साखरपुड्याची सध्या माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. फॅशन डिझायनर असलेल्या मिताली आणि अमित यांच्यातील मैत्री फुलून त्याचे प्रेमात रुपांत झाले. आता बोरुडे आणि ठाकरे कुटूंब एकमेकांच्या नात्यांत बांधले जाणार आहेत. या नव्या नात्यासोबतच ठाकरेंचे नातेसंबंध बीडपर्यंत पोहचले आहेत. 

 

अमित ठाकरे यांच्या होणाऱ्या पत्नी मिताली यांचे वडिल डॉ. अमित बोरुडे हे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडांच्या सुनबाई आणि युवक नेते अक्षय मुंदडांच्या पत्नी नमिता मुंदडा यांचे मामा आहेत. म्हणजेच नमिता आणि मिताली या दोघी एकमेकींच्या आते- मामे बहिण आहेत. या निमित्ताने ठाकरे - बोरुडेंच्या नातेसंबंधाचे धागे बीडमध्ये मुंदडा कुटूंबियांपर्यंत पोचले आहेत. 

 

नमिता आणि मिताली या दोघीही उच्चशिक्षीत असल्याने त्यांची नात्यापलिकडे गट्टी आहे. म्हणूनच आपल्या पत्नी नमिताच्या मामेबहिणीच्या साखर पुड्याला अक्षय मुंदडा पूर्णवेळ राज ठाकरेंच्या घरी थांबून होते. दरम्यान, ठाकरे-पवार कुटुंबा प्रमाणेच आता ठाकरेंचे नातेबंध मुंदडा परिवाराशी देखील जुळले आहेत. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...