आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचा मोठा नेता शिवसेनेच्या गळाला, 19 जूनला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मनसेत नाराज असलेले पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी आमदार शिशिर शिंदे हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. येत्या 19 जूनला शिवसेनेचा 52 वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त शिवसेनेकडून भव्य मेळावा आयोजित केला असून, या मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिशिर शिंदे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मागील काही दिवसापूर्वी शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याचवेळी शिंदे हे शिवसेनेचे मार्गावर असल्याचे बोलले गेले होते. मात्र, शिंदे यांनी या वृत्ताचा इन्कार केला होता. 

 

शिशिर शिंदे हे ठाकरे परिवाराच्या निकटचे मानले जात. 1991 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तानशी क्रिकेट सामने होऊ देणार नाही असा नारा दिला होता. तेव्हा शिवसैनिकांनी हा निर्णय प्रत्यक्षात यावा यासाठी प्रचंड मेहेनत घेतली होती; मात्र कायदा हातात घेऊन थेट वानखेडे स्टेडियमवर पोहोचून खेळपट्टी खराब करण्याची मर्दुमकी गाजवणारे शिंदे त्या काळी हिरो ठरले होते. ठाकरे बंधूंपैकी राज यांच्याशी जवळीक असल्याने ते मनसेच्या स्थापनेनंतर मनसैनिक झाले.


विद्यार्थी सेनेपासून ते राज यांच्यासमवेत वावरत असत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राज यांना रामराम केला होता; मात्र आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा सेनेत परतण्याचा निर्णय घेतला आहे, असे समजते.

बातम्या आणखी आहेत...