आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅ. अमाेल यादव यांच्या विमान कारखान्यासाठी 35 हजार काेटी रुपयांचा करार; पालघरात 157 एकर जागा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स परिषद मुंबईत सुरू आहे. यात वैमानिक अमोल यादव आणि राज्य सरकार यांच्यात 35 हजार कोटींचा करार झाला. - Divya Marathi
मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स परिषद मुंबईत सुरू आहे. यात वैमानिक अमोल यादव आणि राज्य सरकार यांच्यात 35 हजार कोटींचा करार झाला.

मुंबई- स्वदेशी बनावटीचे पहिले विमान बनवणाऱ्या कॅप्टन अमाेल यादव यांचे विमाननिर्मिती कारखाना उभारण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण हाेईल. त्यांच्या कारखान्यासाठी राज्य सरकारने पालघर जिल्ह्यात १५७ एकर जागा देण्याची घाेषणा काही महिन्यांपूर्वीच केली हाेती. अाता थ्रस्ट एअरक्राफ्ट लिमिटेड अाणि राज्य सरकार यांच्यात या प्रकल्पासाठी ३५ हजार काेटी रुपयांचा साेमवारी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये करार झाला. ४ ते ६ महिन्यांत कारखान्यात पहिले विमान बनवू, असा अाशावाद अमाेल यादव यांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केला. प्रकल्पातून १० हजार राेजगार निर्मिती अपेक्षित अाहे. पायलट यादव यांनी घराच्या गच्चीवरच बनवलेले स्वदेशी छाेटेखानी विमान ‘मेक इन इंडिया’त अाकर्षण बनले हाेते. स्वदेशी बनावटीचे विमान महाराष्ट्रातच बनवण्याची त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वताेपरी प्रयत्न केले. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनीही त्यांच्या स्वप्नाला बळ दिले. 


चार महिन्यांत बनेल पहिले प्राेटाेटाइप विमान: अमाेल यादव 
या कारखान्यात ४ विमानांची निर्मिती होईल. पहिल्या टप्प्यातील निर्मितीसाठी २०० काेटींचा खर्च अपेक्षित अाहे. सरकारने ३५ हजार कोटींचा केलेला करार हा संबंधित कंपनीच्या मदतीने पुढील २ वर्षांत छाेटेखानी ६०० विमाने निर्मितीच्या उद्देशाने केलेला अाहे.  माझ्या कारखान्यातून ५ महिन्यांत पहिले प्राेटाेटाइप विमान बनेल. तसेच रिजनल कनेक्टिव्हिटीला बळकटी देण्यासाठी कारखान्यात भविष्यात तयार हाेणाऱ्या विमानांसाठी अाॅपरेटर्सना सहकार्य करण्याची माझी जबाबदारी असेल.


४३ सामंजस्य करार अाणि १२ लाख काेटींची गुंतवणूक
मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेच्या दुसऱ्या दिवशी एकूण ४३ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. या माध्यमातून राज्यात १२ लाख काेटींची गुंतवणूक येणे अपेक्षित अाहे.  एसबीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक बँक, एस बँक, बीव्हीजी लाइफ, नेट मॅजिक, रेडिमेड गारमेंट क्लस्टर, वलसाड जिल्हा सहकारी बँक, कोकण बांबू आणि केन विकास केंद्र, कायनेटिक ग्रीन, बांबू फर्निचर, सोलास इंडस्ट्रियल सिटी (वाडा) आदींशी करार करण्यात अाले.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज व माहिती....

बातम्या आणखी आहेत...