आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षकांचे सरकारविरोधात राज्यभर आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे व शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी शुक्रवारी राज्यभर अांदाेलन झाले. राज्यातील सर्व तालुक्यांतील तहसील कार्यालयांसमोर  व  मुंबईतील आझाद मैदानावर मुंबई कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.  


शिक्षणमंत्र्यांनी गेल्या ३ वर्षांत वेळाेवेळी महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या मान्य असल्याचे प्रत्येक बैठकीत सांगितले. अंमलबजावणीसाठी मात्र प्रत्येकवेळी नवीन तारीख दिली जाते. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची दिवाळीपर्यंत अंमलबजावणी करण्याचे ६ सप्टेंबरच्या बैठकीत ठरले; परंतु हेही अाश्वासन सरकारने पाळले नाही. त्यानंतर १४ नाेव्हेंबरला संघटनेच्या वतीने अांदाेलनाचा इशारा देण्यात अाला हाेता, त्यानंतरही सरकारकडून मागण्या मंजूर करण्याबाबत कोणतीच हालचाल झाली नाही. त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ धरणे अांदाेलनाचा पहिला टप्पा राबवण्यात येत अाहे. त्यानंतर अाठ डिसेंबरपासून राज्यव्यापी अांदाेलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेचे महासचिव अनिल देशमुख यांनी दिला.  


 आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात १९ डिसेंबरला राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल.  सरकारने दुर्लक्ष केल्यास अखेरच्या टप्प्यात बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.  

 

शिक्षकांची वेठबिगारी बंद करा : देशमुख  
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना पाच पाच वर्षे मान्यता आणि वेतन दिले जात नाही. दुसरीकडे त्यांचे शोषण करून सगळी कामे करवून घेतली जातात. अनुदान देण्याची वेळ आली की स्वयंअर्थसाह्य तत्त्वावर दुसऱ्या संस्थेला परवानगी द्यायची, विद्यार्थी संख्या घटली की अनुदान बंद करायचे असा प्रकार सुरू आहे. शिक्षकांची ही वेठबिगारी तातडीने थांबवून जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...