आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वाधिक श्रीमंत शहरात मुंबई 12 व्या क्रमांकावर, न्यूयॉर्क पहिल्या तर लंडन दुस-या स्थानी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत वित्तसेवा, स्थावर मालमत्ता व प्रसारमाध्यमे हे आघाडीचे उद्योग असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. - Divya Marathi
मुंबईत वित्तसेवा, स्थावर मालमत्ता व प्रसारमाध्यमे हे आघाडीचे उद्योग असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मुंबई- मुंबईने जगभरातील आघाडीच्या सर्वात श्रीमंत शहरात 12 वा क्रमांक पटकावला आहे. मुंबई शहराची एकून संपत्ती 950 अब्ज डॉलर इतकी आहे. सर्वात श्रीमंत शहर म्हणून न्यूयॉर्कने पहिला क्रमांक पटकावला आहे. जगातील सर्वात 15 श्रीमंत शहरांविषयीचा अहवाल 'न्यू वर्ल्ड वेल्थ' या संस्थेने तयार केला आहे. या श्रीमंत 15 शहरांत मुंबईच्या पुढे न्यूयॉर्क, लंडन, टोकियो, सॅनफ्रान्सिस्को, बीजिंग, शांघाय, लॉस एंजेलिस, हाँगकाँग, सिडनी, सिंगापूर, शिकागो आदी शहरे आहेत. तर, टोरांटो, फ्रॅंकफर्ट, पॅरिसला मागे टाकून मुंबईने 12 वे स्थान मिळवले आहे. कशी मोजली शहरांची संपत्ती.... 

 

- न्यू वर्ल्ड वेल्थने प्रत्येक शहराच्या एकूण संपत्ती मोजताना नागरिकांच्या खासगी संपत्तीचा विचार केला आहे.
- यामध्ये संबंधित शहरात राहणा-या प्रत्येक नागरिकाकडे दायित्व वजा करून असलेल्या मालमत्तेचे (अॅसेट ज्यामध्ये मालमत्ता, रोकड, इक्विटी व बिझनेस इंटरेस्ट यांचा समावेश आहे) मोजमाप करण्यात आले आहे. 
- मायानगरी मुंबईत 29 अब्जाधीश राहत असून, अब्जाधीशांच्या शहरांतही देशाच्या आर्थिक राजधानीला स्थान मिळाले आहे.
- मुंबई शेयर बाजार (बीएसई) हा जगातील सर्वात मोठा 12 वा भांडवली बाजार ठरला आहे. 
- मुंबईत वित्तसेवा, स्थावर मालमत्ता व प्रसारमाध्यमे हे आघाडीचे उद्योग असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, कोणत्या शहरात किती अब्जांची आहे संपत्ती....

बातम्या आणखी आहेत...