आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई जगातील सगळ्यात श्रीमंत शहराच्या यादीत 12 व्या स्थानावर; संपत्ती 61 लाख कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अब्जाधीशाच्या यादीत मुंबई 10 व्या स्थानावर आहे. तर या शहरात 28 अब्जाधीश राहतात. - Divya Marathi
अब्जाधीशाच्या यादीत मुंबई 10 व्या स्थानावर आहे. तर या शहरात 28 अब्जाधीश राहतात.

मुंबई- जगातील सगळ्यात श्रीमंत शहराच्या यादीत महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी मुंबई 12 व्या स्थानावर आहे. या शहराची एकूण संपत्ती 61 लाख कोटी रुपये आहे. तर 5 शहरांच्या या यादीत 3 ट्रिलियन डॉलर (193 लाख कोटी रुपये) संपत्तीसह न्यूयॉर्क पहिल्या स्थानावर आहे. ही माहिती न्यू वर्ल्ड वेल्थच्या ताज्या अहवालात देण्यात आली आहे. 

 

 

सरकारी संपत्ती किती?
- या संपत्तीत केवळ खासगी मालमत्तेची मोजदाद करण्यात आली आहे. यात सरकारी संपत्तीचा समावेश नाही.

 


मुंबईमध्ये किती अब्जाधीश?
- अब्जाधीशांच्या या दहाव्या क्रमांकावर असून या शहरात 28 अब्जाधीश राहतात.
- अहवालानुसार मुंबई देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर आहे. 

 

कोणते शहर कोणत्या क्रमांकावर

शहर रॅंक

वेल्थ (लाख कोटी रुपये)

लंडन 2nd 173
टोकियो 3rd 161
सॅन फ्रान्सिस्को 4th 147
बीजिंग 5th 141
शांधाय 6th 128
लॉस एंजिलिस 7th 90
हॉगकॉंग 8th 83
सिडनी 9th 64
सिंगापूर 10th 64
शिकागो 11th 63
भारत 12th 61
टोरंटो 13th 60
फ्रॅंकफर्ट 14th 58
पॅरिस 15th 55

 

 

ही शहरे नाहीत यादीत
- अहवालात सांगण्यात आले आहे की टॉप 15 शहरांच्या यादीत ह्यूस्टन, जिनेवा, ओसाका, सियोल, शेंझेन, मेलबर्न, ज्यूरिक आणि डलास या शहरांचा समावेश नाही. 

 

 

सगळ्यात श्रीमंत देशाच्या यादीत भारत 6 व्या क्रमांकावर
- न्यू वर्ल्ड वेल्थच्या मागच्या महिन्याच्या अहवालात, जगातील सगळ्या श्रीमंत देशाच्या यादीत भारत 6 व्या क्रमांकावर आहे. भारताची एकूण संपत्ती 8230 बिलियन डॉलर ( 528 लाख कोटी रुपये) एवढी आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...